aappansare.in

Business

केएसबी लिमिटेडने २०२४ मध्ये २५३३ कोटी रुपयांचे विक्री उत्पन्न नोंदवले असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात १२.७%वाढ

Share
Displaying WhatsApp Image 2025-03-01 at 2.24.58 PM.jpeg

पुणे : केएसबी लिमिटेडने 2024सालासाठी उल्लेखनीय विक्री उत्पन्नाची घोषणा केली आहे. केएसबी लिमिटेडने २०२४ मध्ये २५३३ कोटी रुपयांचे विक्री उत्पन्न नोंदवले असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात १२.७%वाढ झाली आहे.
चौथ्या तिमाहीतील विक्री उत्पन्नात मागील वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत २०.५%वाढ नोंदवली गेली, आणि तिमाही समाप्त करताना विक्री उत्पन्न ७२६.४कोटी रुपये होते.कंपनीच्या वतीने २०० टक्क्यांचा घसघशीत लाभांशजाहीर केला असून कंपनीचे स्थान अधिकाकाधिक बळकट होत आहे. दरवर्षी सातत्याने प्रगती होत असल्याचे हे निदर्शक आहे.  

केएसबी लिमिटेडचे सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत कुमार या व्यावसायिक प्रगतीविषयी भाष्य करताना म्हणाले, “या वर्षी आमच्या कंपनीने चांगली प्रगती केली असून विक्री महसूलात १२.७ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. आम्ही सोलर, व्हॉल्व्स, बिल्डिंग सर्व्हिसेस, वेस्ट वॉटर, आणि डोमेस्टिक विभागांमध्ये चांगल्या प्रगतीचे लक्ष्य गाठलेले आहे. या वर्षी निवडणुकांसह इतर विविध कारणांमुळे व्यावसायिक प्रकल्पांचा वेग काहीसा मंदावलेला होता तरीहीआम्ही मरीन क्षेत्रात प्रगती केली आहे तसेच ग्रीन हायड्रोजन व रेल्वे विभागांकडून काहीमहत्वाच्याऑर्डर्स मिळवल्या आहेत.उत्तम व्यावसायिक वाटचालीवर आणि निर्यातीवर आमचा भर असून अर्थव्यवस्थेतील छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम आम्ही आमच्यावर होऊ देणार नाही. आमच्या निर्यातीच्या व्यवसायामुळे आम्ही आमचे जागतिक स्तरावरील स्थान अबाधित राखण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up