कवयित्री वर्षा कुलकर्णी यांना काव्य जीवनगौरव पुरस्काररंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी होणार गौरव
Share
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्य जीवनगौरव पुरस्काराने ‘वृत्तबद्ध कविता : कला आणि शास्त्र’ या ग्रंथाच्या लेखिका आणि ज्येष्ठ कवयित्री वर्षा कुलकर्णी यांचा सन्मान केला जाणार आहे.
यंदाचा पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
वर्षा कुलकर्णी यांनी शालेय जीवनापासून कविता लेखन केले आहे. वृत्तबद्ध काव्यलेखन करण्यात त्यांना विशेष रुची आहे. ‘वृत्तबद्ध कविता : कला आणि शास्त्र’ या ग्रंथाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीच्या पहिल्या वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे.

वर्षा कुलकर्णी