कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे शनिवारी तिळगुळ समारंभ
Share
पुणे : कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे संक्रातीनिमित्त तिळगुळ आणि हळदी-कुंकू कार्यक्रमाचे शनिवार, दि. 8 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता पुण्याई सभागृह, पौड रोड, पुणे येथे होणार आहे. या निमित्ताने प्रख्यात गायिका मृदुला मोघे यांचा ‘एका पेक्षा एक’ हा सांगीतिक एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान करण्यात येणार आहे. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी, 12वी, पदवी, पदविका तसेच उच्च शिक्षणात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ब्राह्मण कार्यालय, पेरुगेट जवळ, सदाशिव पेठ, पुणे येथे होणार आहे.