पुणे येथे आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा संघ, नवी दिल्ली, या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश तसेच, पुणे शहर कार्यकारणीच्या पदाधिकारी यांची निवड संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आली. तर नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुल उर्फ मनोज जगताप यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित सदस्यांना ओळखपत्र व निवडपत्र देण्यात आले. निवड झालेल्या नवनिर्वाचित सदस्य खालील प्रमाणे आहेत. अध्यक्ष, पुणे […]
या लिंक वर क्लिक करा आणि अंक जरूर वाचा या संपूर्ण ई-दिवाळी अंकाची मुखपृष्ठ मांडणी, अक्षरजुळणी, सजावट आणि फ्लिप बूक आरेखन वैजयंती आपटे यांनी केलेले आहे. आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या पुणे विभागाचा राजसी हा दिवाळी अंक फ्लिप बूक स्वरूपात आहे. सर्वानी नक्की वाचा आणि प्रतिक्रिया नोंदवा. वैजयंती आपटेआम्ही सिद्ध लेखिकातंत्रज्ञान समिती प्रमुख9892836604
पुणे : आडकर फौंडेशन पुरस्कृत कोमल पवार स्मृती पुरस्कार वितरण समारंभ आणि ‘पुनर्जन्म’ या विषयावर कविसंमेलनाचे बुधवारी (दि. 6) आयोजन करण्यात आले आहे. मरणोत्तर अवयवदान संकल्पनेच्या प्रचाराचे गेली 24 वर्षे काम करणाऱ्या आरती देवगावकर यांचा कोमल पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असून पुरस्काराचे वितरण इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर […]
पुणे : मुळशी तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी कातकरी, कातकरी व आदिवासी वस्तीवरील पस्तीस कुटुंबांसोबत दिवाळीसण साजरा करण्याचा अभिनव विधायक उपक्रम जय गणेश व्यासपीठमधील गणेश मंडळांनी राबविला. दिवाळीचा आनंद वंचितांना देखील साजरा करता यावा म्हणून पुण्यातील गणेश मंडळे 12 वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत. बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, मॉडेल कॉलनी येथील अजिंक्य मित्र मंडळातर्फे लवासा रस्त्यावरील पिरंगुट, गाढववाडी व कुंभारवाडी येथील पस्तीस कुटुंबांना […]
पुणे : साहित्यिक, वाचकांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या उत्कर्ष बुक सर्व्हिस येथे खुसखुशीत, खुमासदार साहित्य फराळाचा आस्वाद आज पुणेकरांनी घेतला. डेक्कन जिमखाना येथील सुप्रसिद्ध उत्कर्ष बुक सर्व्हिस येथे गेल्या वीस वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध लेखक, वाचक या फराळाचा आवर्जून आनंद घेत वैचारिक देवाण घेवाण करतात. आजच्या दिवाळी फराळ गप्पांमध्ये सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध […]
WhatsApp us