अल्पवयीन मुलाच्या मोबाइलवरील मालिका संपली असल्याने ती बंद केल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने आईवर कात्रीने जीवघेणा वार करण्याचा प्रयत्न केला.तसेच मुलाने घरातील खिडकीच्या काचा फोडून आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना धनकवडी परिसरात घडली याबाबत त्याच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी अल्पवयीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला धनकवडी भागात […]
‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी ‘फुलवंती’ आपल्या भेटीला येतेय. तिच्या येण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच ; फुलवंती’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लक्ष वेधून घेतोय. ट्रेलरमध्ये ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी यांच्यावरून नजर हटत नाही. […]
उपउपांत्य फेरीसाठी 11 स्त्री स्पर्धकांच्या नावांची घोषणा पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) आयोजित गुणीजान बंदिश स्पर्धेच्या स्त्री विभागातून उपउपांत्य फेरीत पोहोचलेल्या 11 स्पर्धकांच्या नावांची आज (दि. 16) घोषणा करण्यात आली. यातून सहा स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर गुणीजान बंदिश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
पुणे : गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन (GRACE) फाऊंडेशनतर्फे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर घेण्यात आलेल्या गुणीजान बंदिश स्पर्धेची उपांत्य फेरी ते अंतिम फेरी दि. 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आली असून दि. 20 ऑक्टोबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पद्मभूषण […]
WhatsApp us