पुणे : निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, म्हणून सरकारकडून सातत्याने जनजागृती मोहीम राबवली जाते. परंतु याच्या उलट, वाघोलीतील शेकडो नागरिकांचे मतदार ओळखपत्र अर्ज सातत्याने व योजनाबद्ध पद्धतीने शिरूर निवडणूक विभागाकडून नाकारले जात आहेत. हा लोकशाही व्यवस्थेवर घातक आघात असून, नागरिकांना मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप वाको वेल्फेअर असोसिएशनने पत्रकार परिषदेत केला […]
पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी महार इतिहासावरती चित्रपट काढण्यात यावा. छत्रपती संभाजी महाराजांचे निष्ठावंत आणि विश्वासूस मित्र आणि सेवक रायप्पा महार हे मानले जायचे. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर झाला. रायप्पा मार हे संभाजीराजांच्या अंगरक्षकापैकी एक होते. रायप्पांच्या पराक्रमाची दखल घेऊन संभाजी राजांनी दरबारात त्यांचा […]
अमोल मिटकरींवर कारवाईची मागणी. ठाणे – भारताचे भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभूराम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात आज तीव्र निदर्शने करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला. अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधाने केल्याबद्दल […]
मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातील मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा विविद राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२५ रोजी आदेश देऊन मशिदींसह प्रार्थना स्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, हा मुद्दा भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी […]
पियुष गोयल यांच्या निराधार आरोपांवर कॉँग्रेसची प्रखर टीकापुणे :भारत सरकारचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री हे एशिया इकॉनॉमिक डायलॉग (AED) परिषदेच्या निमित्ताने पुणे शहरात आले होते, याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत चिन सोबतच्या आंतरराष्ट्रीय व्यापार तुटीचे खापर अकरा वर्षांपूर्वीच्या युपीए सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न करून मोदी सरकारच्या उद्योग – व्यापार वाढीतील अपयशाचे खापर पुन्हा एकदा कॉँग्रेसवर […]