पुणे : कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे कोजागरी पौर्णिमेनिमित्त ‘कार्तिक महात्म्य’ या विषयावर ह. भ. प. अद्वैता उमराणीकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रम रविवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्याई सभागृह, पौड रोड या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.