aappansare.in

Social

पायलट होण्याची सुवर्णसंधी

Share

पुणे : विमानवाहतुकीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “कमर्शियल पायलट लायसन्स” या विषयावर विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेमिनार रविवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर येथील पीएमसी मेट्रो स्टेशनजवळील एव्हिएशन अँड स्पेस म्युझियम येथे होणार आहे.

या सेमिनारचे नेतृत्व यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन नितीन बेंद्रे करणार आहेत. विमानवाहतुकीतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांना दिशा देणारा आणि प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्यासोबत संचालक रश्मी इंदुलकर आणि मुख्य ग्राउंड प्रशिक्षक कॅप्टन अतुल वास्कलेही आणि इतर वैमानिक उपस्थित राहणार असून विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन या सेमिनारमध्ये होणार असल्याची माहिती नितीन बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संचालक रश्मी इंदुलकर, यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे मुख्य ग्राउंड प्रशिक्षक कॅप्टन अतुल वास्कले आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन म्युझियमचे व्यवस्थापक सुजित शेंडकर उपस्थित होते.

कॅप्टन नितीन बेंद्रे म्हणाले , “सेमिनारमध्ये पायलट प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया, शिक्षणासाठी आवश्यक असलेले टप्पे, शैक्षणिक कर्ज सुविधा, गुंतवणूक आणि भावी उत्पन्नाच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. तसेच भारतासह विदेशात पायलट म्हणून उपलब्ध असलेल्या संधींचाही आढावा घेण्यात येणार आहे. जागतिक आणि स्थानिक पातळीवरील नोकरीच्या संधींची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना करिअर नियोजन अधिक सोपे होणार आहे. यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना विमानवाहतुकीतील करिअरसाठी मार्गदर्शन केले आहे. या सेमिनारच्या माध्यमातून इच्छुक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून पायलट होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुजित म्हणाले, ” या क्षेत्रातील अधिक माहिती आजच्या युवकांना नाही म्हणून या क्षेत्राकडे वळण्याचा युवकांचा कल हा कमी असतो पुण्यासारख्या शहरात त्याचबरोबर मध्यवर्ती ठिकाणी एवढ्या प्रशस्त जागेत एव्हिएशन सेक्टरमधील ही म्युझियम उभी आहे याचे व्यवस्थापन आज माझ्या हातात आहे गेल्या वर्षभरात आम्ही पाहिला आहे अनेक विद्यार्थी आवडीने येतात आणि या क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक असतात यावरून एक गोष्ट लक्षात येते युवकांना या क्षेत्रात यायची इच्छा आहे मात्र योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही यासाठी आम्ही या म्युझियम मध्ये नामांकित क्षेत्रातील व्यक्तींना बोलवून सेमिनार घेण्याचे आयोजले आहे तर पुणेकरांना आवाहन आहे ते सेमिनारचा पुरेपूर लाभ घ्यावा”.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *