अमेरिका स्थित भारतीयांना सरकारने आकर्षित केले पाहिजेत – कर्नल आठले
Share
चीनला आव्हान देणारा भारत एकमेव देश
पुणे (प्रतिनिधी ) ट्रम्प सरकार सध्या अमेरिकेतील भारतीयांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीचा विचार करता भारत सरकारने तेथील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञानां आपल्याकडे आकर्षित केले पाहिजेत. अमेरिका स्थित उच्च तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्या मदतीने आपल्या देशात जागतिक दर्जाची तंत्रज्ञान विकसित करून चीनला पायबंद घालता येईल. आता संधी आहे तर सरकार ने याचा फायदा घेतला पाहिजेत. असा विश्वास कर्नल (नि) अनिल आठले यांनी केले.
बडोदे मित्र मंडळाच्या वतीने एस एम जोशी सभागृहात आयोजित केलेल्या “मेजर रेगे* स्मृती व्याख्यानमालेत ‘जागतिक सत्ता संतुलन- भारतासाठी संधी’ यावर विषयावर बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे परम विशिष्ठ सेवा मेडल, अतीविशिष्ठ सेवा मेडल, विशिष्ठ सेवा मेडल विजेते नौसेनेचे व्हाईस ऍडमिरल (नि) मुरलीधर पवार यांनी सागरी युद्ध प्रणाली आणि, “सागरी मोहीम ” या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी कर्णल सुरेश रेगे,बडोदे मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयसिंग पाटील,उपाध्यक्ष अतुल शहा,सचिव अच्युत यार्डी उपसचिव कमांडर नीलेश दिघावकर, विश्वस्त प्रभाकर जोशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठले पुढे म्हणाले कि, 1990 मध्ये सोवियत संघाचा अंत झाल्यावर अमेरिकेची निरंकुश दोन दशके सत्ता निर्माण झाली.सत्तेचा फायदा घेवून अमेरिकेने इराक, इराण अफगाणिस्तान सिरिया अशा देशांवर आक्रमने केली. सोव्हीयत सोबत युरोपिय देशांना आपल्या गोठात सामावून घेतले.चीन महासत्ता म्हणून उदयास आला. यामुळे अमेरिकेची आर्थिक पीछेहाट झाली. त्यात ट्रम्प राष्ट्रध्यक्ष बनल्यापासून अमेरिकेत आशियाई व इतर वंशिक वाईट वागणूक देत आहे. उच्च राहणीमान आणि शैक्षणिक व इतर संधी मिळण्यासाठी भारतीय अमेरिकेत गेले होते. सध्या भारतीयांची अमेरिकेत द्विधा अवस्था झाली आहे.याचाच फायदा घेवून सरकारने अमेरिकेतील शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ भारतात परत येण्यासाठी आकर्षित करण्याची गरज आहे. आपण जर संशोधन व तांत्रिक प्रगती वर भरणे दिल्यास आपण 20 47 पर्यंत भारत विकसित देश होऊ शकणार नाही विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात चीन आपल्यापेक्षा वीस वर्षांनी पुढे आहे. अमेरिकेच्या तंत्रज्ञानाला तोडीस तोड शस्त्र चीन विकसित करीत आहे. हे स्पष्ट असल्याने पाश्चिमात्य देश येथे 50 वर्ष तरी चीनला पाय बंद घालण्यासाठी भारताची मदत घेणार आहे हे स्पष्ट आहे. जगाच्या राजकारणात मनुष्यबळ व आर्थिक चीनला आव्हान देणारा भारत हा एकमेव देश आहे. असे आज पश्चिमात्या राष्ट्रांना सुद्धा पटलेले आहे. याचाच परिणाम म्हणून विकसित राष्ट्रांच्या वार्षिक संमेलनात दरवर्षी भारताला आमंत्रित केले जाते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉ जयसिंग पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन गायत्री जाधवराव यांनी तर आभार अतुल शहा यांनी मानले.
यावेळी कर्नल पवार म्हणाले कि, जगात भारताला महासत्ता बनायचे असेल तर सागरी मार्गांला अधिक आर्थिक सक्षम करण्याची गरज आहे. शिवरायांच्या काळामध्ये देशाला लाभलेल्या सागरी महामार्ग हा दुर्बल होता. त्यामुळे पोर्तुगीज भारतात आले. पाठोपाठ इंग्रज येऊन आपल्या देशावर राज्य केलं. ज्या देशाचा सागरी मार्ग मजबूत सक्षम अभेद्य असेल तो देश जगात महासत्ता देश होईल.असा विश्वास व्यक्त करून पुढे ते म्हणाले कि, देशाची आर्थिक घडी सु व्यवस्थित ठेवण्यासाठी समुद्र साधन संपत्ती उवयुक्त ठरते. आणि ही साधन संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी नौसेना सदैव अग्रेसर असते, शिवाय नौसेना समुद्र चाचापासून बचाव तसेच सागरी मार्गाने चालणारा व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी नौसेना अतोनात प्रयत्न करीत असते, मात्र आजची तरुण पिढी नौसेनेमध्ये येण्यासाठी धजत नाही कारण या क्षेत्रामध्ये काळा पैसा मिळत नाही. मात्र तुम्हाला देश सेवा करायची असेल तुमचे, जीवनमान उंचवायचे असेल, मान,सन्मान, स्वाभिमानाने पैसा कमवायचा असेल तर नौसेनेमध्ये नक्की करिअर करावे. यामुळे देशाची,आपली व आपल्या वडिलांची मान उंचवेल. असा सल्ला दिला.
डॉ पाटील म्हणाले कि, सयाजीराव गायकवाड महाराजांच्या कार्याचा प्रसार व प्रचारासाठी अखलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली.
फोटो ओळ-
डावीकडून कर्नल अनिल आठले, व्हाइस एडमिरल मुरलीधर पवार, कर्नल सुरेश रेगे, डॉ. प्रभाकर जोशी, डॉ. जयसिंग पाटील, कमांडर निलेश दिघावकर, अतुल शहा, अच्युत यार्डि