भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक बिनविरोध
Share

अध्यक्षपदी अभय फिरोदिया

उपाध्यक्षपदी डॉ. प्रमोद जोगळेकर
पुणे दि. 7 जुलै – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळाची 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून यामध्ये अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. प्रमोद जोगळेकर आणि अन्य पदाधिकार्यांच्या निवडीची घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी केली. याबरोबरच संस्थेचे विश्वस्त म्हणून माजी खासदार प्रदीप रावत व भारत फाटक यांची तर सर्वसाधारण़ सभेच्या अध्यक्षपदी अॅड. सदानंद फडके व उपाध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळात एकूण 25 सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून यामधील 7 सदस्यांची कार्यकारी मंडळामध्ये निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी भूपाल पटवर्धन, मानद सचिवपदी प्रा. सुधीर वैशंपायन, खजिनदारपदी संजय पवार तर सदस्यपदी डॉ. सदानंद मोरे, श्रीनिवास कुलकर्णी, प्रा. प्रदीप आपटे व डॉ. मैत्रेयी देशपांडे निवड झाली आहे. तर नियामक मंडळाच्या सदस्यपदी सुश्रुत वैद्य, मंदार जोग, मनोज एरंडे, प्रा. रवींद्र मुळ्ये, संतोष रासकर, साकेत कोटीभास्कर, देवयानी कुलकर्णी, सुनिल भंडगे, आशुतोष जोशी, अनिरुध्द देशपांडे, राजेंद्र जोग, अपूर्व सोनटक्के, अरुण नहार, डॉ. शिल्पा सुमंत, सुनिल त्रिंबके व अमित परांजपे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद जोशी व जितेंद्र आफळे यांनी काम पाहिले.