डॉक्टर्स डे निमित्त शालेय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न”
Share
१ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर डे म्हणून भारतभर साजरा केला जातो या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने हुजूरपागा कात्रज मांगडेवाडी येथील शाळेतील सर्व विद्यार्थिनींचे आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्याच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आले.
विद्यार्थ्यांकडून ढोल व लेझीमच्या गजरात डॉक्टरांचे स्वागत करण्यात आले तसेच हुजूरपागा शाळेच्या वतीने सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती पंडित मॅडम व सुपरवायझर दिप्ती कुलकर्णी मॅडम व त्यांच्या सर्व स्टाफने अतिशय चांगले नियोजन केले.या शिबिरामध्ये ३० डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.

त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. शशिकांत कदम,
डॉ. सुनील होनराव, डॉ. मंजिरी जगताप , डॉ.अनुपमा गायकवाड,
डॉ. राजश्री काकडे, डॉ. सुनील धुमाळ, डॉ. दीपक पाटील, डॉ. संगीता माने, डॉ.स्वप्नील मोरे, डॉ. नितीन ढुमणे, डॉ.ज्योती रसाळ, डॅा. गणेश निंबाळकर व इतर डॉक्टरांनी या तपासणीमध्ये सहभाग घेतला .
या सर्व डॅाक्टरांचे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश प्रमुख डॉ.सुनील जगताप यांनी व मुख्याध्यापिका कीर्ती पंडित मॅडम यांनी आभार मानले.