जांभूळवाडी दत्तनगर वाहतूक समस्या जैसे थे
Share

जांभळवाडी रोड आंबेगाव बुद्रुक दत्तनगर चौक वाहतुकीच्या समस्या काही सुटेनात. या भागात बांधकाम मोठ्या प्रमाणात झाल्याने गुंठा दोन गुंठे कमी किमतीमध्ये फ्लॅट या ठिकाणी लोकांनी खरेदी करून वास्तव्यास आलेली आहेत परंतु या भागाचा रस्ता 19 97 मध्ये हा भाग महानगरपालिकेमध्ये गेला आणि या भागाचा आराखडा डीपी तयार झाला परंतु जागा ताब्यात नसल्याने रस्ता ज्या ठिकाणी बारा मीटरचा आहे म्हणजेच 40 फुटी आहे त्या ठिकाणी फक्त 12 फूटच रस्ता ताब्यात आणि या भागामध्ये अनेक शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावं लागतं त्यामुळे सकाळी नऊ ते साडेदहा त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा ते नऊ या भागांमध्ये प्रचंड गर्दी असते ती कमीत कमी या भागातून दीड ते दोन तास आपण जाऊ शकत नाही तसा विचार करता या प्रभाग क्रमांक जुन्या 40 मध्ये नको असलेली कामे झालेली आहे आणि जी काम करायला होती ती झालेली नाही म्हणजेच कचरा प्रकल्पाचे काम या ठिकाणी झालेला आहे दोन्ही गावाला सेपरेट स्मशानभूमी पण असताना या ठिकाणी बांध काम तयार झालेले आहे परंतु जाण्याचा रस्ताच नाही म्हणजे फुकट संधी त्या ठिकाणी रस्ता पडलेला आहे एखादा एखादी गोष्ट जर आपण शासनाचा निधी करा वापरला तर त्याचा वापर झाला पाहिजे त्या ठिकाणी कसलाही वापर नव्हता त्या ठिकाणी तळी रामाचा अभ्यास झालेला आहे या भागातली लाईट एक दिवस पण असा नाही की या भागातील लाईट जात नाही दोन दोन तीन तास या ठिकाण हा एक नागरिकांना खूप महत्त्वाचा त्रास या ठिकाणी सामोरे जायला लागत आहे पाणी प्रश्न असेल कचरा असं स्ट्रीट लाईटचा असेल असे अनेक प्रश्न या भागांमध्ये गेले कित्येक दिवस पडलेले आहेत आणि लोकांना या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्याने ह्या समस्या घेऊन जायचं कुणाकडे आणि कुणाला सांगायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे खरं तर प्रथमता रस्त्याचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रथम या भागातली डीपी रोड खुले करणे गरजेचे आहे माननीय आयुक्त साहेबांनी त्यांच्या अस्तित्वाखाली डीपी रोडवरच्या कारवाई करून हा डीपी रोड ताब्यात घेणं अतिशय महत्त्वाचा आहे तरच कुठेतरी काहीतरी होईल.नागरिकांच्या समस्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हि मागणी फार पूर्वी पासूनची आहे पण स्थनिक राजकारण व बांधकाम नियोजन नीट नसल्याने रस्ते बारीक व लोकांची वर्दळ जास्त प्रमाणात आहे
त्यात स्थनिक नेते व पुढारी हे फक्त पुढारीपणा करतात व निवडणूक आली कि आस्वासन देतात प्रत्यक्ष करत काहीच नाही त्यामुळेच कि काय नेत्यावरील विश्वास कुठेतरी कमी होतोय
