aappansare.in

Social

आमी डाकिनी – हुस्न भी, मौत भी: एक नवीन धमाकेदार मालिका

Share

‘आहट’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी आता घेऊन येत आहे, ‘आमी डाकिनी’.


आमी डाकिनी ही एक प्रेम कहाणी आहे, जी समय आणि जीवनकालाच्या मर्यादा जुमानत नाही. डाकिनीला प्रेमाची आस आहे, जे एक काळी तिचे होते, आणि ते प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी ती अनेक जन्म ओलांडून पुन्हा जगात आली आहे. या जगाला ती भूतकाळात लुप्त झालेल्या आवाजाचा पडसाद वाटत असली, तरी ती मात्र आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठीच आली आहे.
या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे डाकिनी- भुलवणारी, मोहक आणि ठाम. खूप पूर्वी गमावलेला आपला पती पुन्हा मिळवण्याचा निर्धार तिने केला आहे. तिच्या प्रवासात प्रेम आणि भावातिरेक, सौंदर्य आणि विनाश यांच्यातील सीमारेषा पुसट होतात. रहस्य आणि छाया यांच्या राज्यात तिचा वास आहे आणि तिच्या मार्गात जो कुणी येतो, तो स्वतःची कहाणी सांगण्यासाठी जिवंत राहात नाही.
आमी डाकिनी मालिकेचे वेगळेपणे हे आहे की, त्याचे कथानक केवळ भय आणि उत्कंठा निष्पन्न करणारे नाही, तर त्यात भावनांची देखील गुंफण आहे.
डाकिनीचे पात्र जिवंत करणार आहे अभिनेत्री शीन दास. तिच्यासाठी ही आजवर तिने केलेल्या भूमिकांपैकी एक अत्यंत जटिल भूमिका आहे. आपला अनुभव सांगताना शीन म्हणते, “ही भूमिका मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा फारच वेगळी आहे. डाकिनी ही खूप गुंतगुंतीची व्यक्तिरेखा आहे जिच्यात अनेक विरोधाभासी पदर आहेत. ती सामर्थ्यशाली आहे, भयावह आहे आणि बेधडक आहे. तिची भूमिका साकारण्याचा प्रवास आनंददायक होता. एक अभिनेत्री म्हणून मी आजवर जेथे पोहोचले नव्हते अशा ठिकाणी मनाने आणि भावनेने घेऊन जाणारी ही व्यक्तिरेखा आहे. या प्रवासात उत्साहाचे, भीतीचे, अंतर्मुख करणारे, अस्वस्थ भावनांचा सामना करायला भाग पडणारे क्षण होते. मला खात्री वाटते की, तिचा अंदाज येऊ न शकणारा स्वभाव आणि तिचे अंधारे, थरारक जग प्रेक्षकांना मोहित करेल. ही फक्त एक मालिका नाही, तर भावनांचे रोलरकोस्टर आहे, जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.”

वेधकता, भावना आणि भयावहतेचा स्पर्श असलेली ‘आमी डाकिनी’ ही मालिका प्रेक्षकांसाठी एक अनोखा व्हिज्युअल आणि भावनिक प्रवास असेल.

बघायला विसरू नका, ‘आमी डाकिनी’ 23 जूनपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up