aappansare.in

Motivational

व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा !!

Share

अभिजीत रानाडे, पारस गुप्ता यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत !!

पुणे, १७ जूनः ब्रिजसँग टे्रनिंग्ज आणि कॉनर्र पॉकेट्स स्नुकर अ‍ॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली अखिल भारतीय १०-रेड स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजीत रानाडे आणि आग्राच्या पारस गुप्ता यांच्यामध्ये विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

पुण्यातील कँप भागातील कॉनर्र पॉकेट स्नुकर अ‍ॅकॅडमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीमध्ये पारस गुप्ता याने कॉर्नर पॉकेट्सच्या पिनाक अनाप याचा सरळ फ्रेममध्ये ५४-३३, ४९-२८, ५९-३८, ४६-२७, ५५-३८ असा पराभव केला. पारस याने सामन्यावर वर्चस्व गाजवताना एकही फ्रेम न गमवताना विजय मिळवला.

चुरशीच्या झालेल्या दुसर्‍या उपांत्य फेरीमध्ये पीवायसी हिंदु जिमखाना क्लबच्या अभिजीत रानाडे याने मध्यप्रदेशच्या इम्रान खान याचा ५-४ असा पराभव केला. सुमारे साडेचार तास सुरू असलेल्या या सामन्यामध्ये अभिजीत याने इम्रान याचा २-४ अशा पिछाडीवरून मात करून अंतिम फेरी गाठली. पहिल्या चार फ्रेमनंतर २-२ अशी बरोबरी सामन्यामध्ये होती. पाचवी आणि सहावी फ्रेम ५२-३१, ५४-२० अशी जिंकून इम्रान याने ४-२ अशी आघाडी घेतली होती. सामना जिंकून अंतिम फेरीमध्ये पोचण्यासाठी त्याला फक्त एक फ्रेम जिंकायची होती. परंतु पिछाडीवरून दबावाखाली उत्तम खेळ करून अभिजीतने ५०-१५, ५०-२१, ६१-४४ अशा सलग तीन फ्रेम जिंकल्या आणि अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकालः मुख्य ड्रॉः उपांत्यपुर्व फेरीः
पारस गुप्ता (आग्रा) वि.वि. सुमित अहुजा (मुंबई) ४-३ (५४-३२, २४-५३, ३१-४६, ५२-३६, ५८-३४, ३८-४९, ५२-३९);
इम्रान खान (मध्यप्रदेश) वि.वि. जेसन मल्होत्रा (दिल्ली) ४-२ (५६-३२, ३४-५८, ४८-२९, २७-५०, ५१-३८, ४९-३९);
अभिजीत रानाडे (पीवायसी हिंदु जिमखाना) वि.वि. साद सय्यद (कॉर्नर पॉकेट्स) ४-१ (५६-३२, ४९-३६, ३१-५३, ५८-३९, ४८-२३);
पिनाक अनाप (कॉर्नर पॉकेट्स) वि.वि. सुरज राठी (पुना क्लब) ४-१ (२२-४५, ५८-३२, ४६-२५, ४८-३४, ५०-३८);

उपांत्य फेरीः
पारस गुप्ता (आग्रा) वि.वि. पिनाक अनाप (कॉर्नर पॉकेट्स) ५-० (५४-३३, ४९-२८, ५९-३८, ४६-२७, ५५-३८);
अभिजीत रानाडे (पीवायसी हिंदु जिमखाना) वि.वि. इम्रान खान (मध्यप्रदेश) ५-४ (३३-६२, ६१-२४, ३८-३५, २३-५३, ३१-५२, २०-५४, ५०-१५, ५०-२१, ६१-४४).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up