अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पुणे वॉरियर्स संघाला पहिलेवहिले विजेतेपद
Share
पुणे, १४ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत थरारक अंतिम लढतीत
कर्णधार अनुजा पाटील नाबाद ३०धावा व २-३०) हिने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघावर १ धावेने थरारक विजय मिळवत पहिलेवहिले विजेतेपद संपादन केले. याआधीच्या साखळी फेरीत पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध दोन्ही लढतीत सोलापूर स्मॅशर्स संघावर विजय मिळवला होता. या विजयाबरोबरच पुणे वॉरियर्स संघाने आपली अपराजित राहण्याची मालिका कायम ठेवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत सुरुवातीला पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्यात आला. सोलापूर स्मॅशर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर ख़ुशी मुल्ला १७ धावा काढून तंबूत परतली. त्यात तिने ३चौकार मारले. सोलापूरच्या शरयू कुलकर्णीने खुशीला झेल बाद केले व संघाला पहिला धक्का दिला. सुहानी कहांडळने २० धावा काढून बाद झाली. त्यानंतर अक्षया जाधवने २३चेंडूत १चौकार व २षटकारासह २९धावा काढून संघाची धावगती वाढवली. कर्णधार अनुजा पाटीलने २१चेंडूत नाबाद ३० धावांची संयमी खेळी केली. तिने २चौकार व १षटकार खेचले. अनुजाने श्वेता मानेच्या समवेत चौथ्या विकेटसाठी ३८चेंडूत ५३ धावांची भागीदारी करून संघाला १८षटकात ६ बाद १२९ अशी समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. सोलापूर स्मॅशर्सकडून स्वांजली मुळे(२-६), आचल अगरवाल(२-२६) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
१२९धावांचे आव्हान सोलापूर स्मॅशर्स संघाला १८ षटकात ६बाद १२८धावाच करता आल्या. सोलापूरची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ईश्वरी अवसरे(८)धावांवर तंबूत परतली. तिला पुणे वॉरियर्सच्या अनुजा पाटीलने झेल बाद केले. त्यानंतर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधार तेजल हसबनीसने आक्रमक सुरुवात केली. तिने २चौकार व १षटकार ठोकले. पण पुणे वॉरियर्सच्या इशिता खळेने तिला पायचीत केले व सोलापूर स्मॅशर्सला मोठा धक्का दिला. ईश्वरी सावकारने २०चेंडूत १चौकारासह २२धावांची खेळी करून धावफलक हलता ठेवला. ईश्वरी सावकारला चोरटी धाव घेत असताना धावबाद झाली. मुक्ता मगरेने एकाबाजूने संघाची धुरा सांभाळताना चेंडूत चौकारासह ४० धावांची खेळी केली. मुक्ता मगरेला इशिता खळेने झेल बाद करून सामन्यातील रोमांच वाढवला. शाल्मली क्षत्रियने धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सोलापूर स्मॅशर्स संघाला विजयासाठी ६ चेंडूत ९ धावांची आवश्यकता होती. हे षटक कर्णधार अनुजा पाटीलने घेतले. पहिल्या चेंडूवर दामिनी बनकरने एक धाव घेतली. त्यानंतर शाल्मलीने चौकार मारत विजयाचे लक्ष्य आणखी कमी केली. पण चौथ्या चेंडूवर शाल्मलीला तिने अनुजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेतला व सामन्यात रंगत आणली. १चेंडूत २ धावांची गरज असताना स्वांजली मुळेने अनुजाच्या हातात चेंडू मारला व अनुजाने मिळालेल्या संधीचे सोने करत तिला धावबाद केले व विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व २० लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व १०लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीएचे मानद सचिव अॅड. कमलेश पिसाळ, सहसचिव श्री. संतोष बोबडे, एमपीएलचे चेअरमन श्री. सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य श्री. शुभेंद्र भांडारकर, श्री. सुहास पटवर्धन, श्री. राजू काणे, श्री. सुनील मुथा, श्री. विनायक द्रविड, श्री. सुशील शेवाळे, श्री. रणजीत खिरीड, श्री. केशव वझे, श्री. अजय देशमुख, सौ. कल्पना तापीकर, सीईओ श्री. अजिंक्य जोशी, तसेच सर्व संघमालक, सर्व जिल्हा संघटनेचे सदस्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स: १८ षटकात ६बाद १२९धावा(अनुजा पाटील नाबाद ३०(२१,२x४,१x६), अक्षया जाधव २९(२३,१x४,२x६), श्वेता माने २५(१९,३x४), ख़ुशी मुल्ला १७, सुहानी कहांडळ २०, स्वांजली मुळे २-६, आचल अगरवाल २-२६, शरयू कुलकर्णी १-१९) वि.वि.सोलापूर स्मॅशर्स:१८ षटकात ६बाद १२८धावा(मुक्ता मगरे ४०(४१,४x४), शाल्मली क्षत्रिय ३४(२३,४x४), ईश्वरी सावकार २२, तेजल हसबनीस १६, इशिता खळे २-२४, अनुजा पाटील २-३०) सामनावीर – अनुजा पाटील.
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट फलंदाज: ईश्वरी सावकार(२४७धावा, सोलापूर स्मॅशर्स);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: चिन्मयी बोरफळे(१३विकेट, पुणे वॉरियर्स)