‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा !!
Share
अनुज अगरवाल, अन्वर गाझी, मनिष तलरेजा, प्रसाद जुजगर, गौरव देशमुख, अमिन उसगांवर यांची विजयी कामगिरी !!
पुणे, १४ जूनः ब्रिजसँग टे्रनिंग्ज आणि कॉनर्र पॉकेट्स स्नुकर अॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली अखिल भारतीय १०-रेड स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या अनुज अगरवाल, अन्वर गाझी यांच्यासह पुण्याच्या मनिष तलरेजा, प्रसाद जुजगर, गौरव देशमुख, अमिन उसगांवर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसर्या फेरीत प्रवेश केला.
पुण्यातील कँप भागातील कॉनर्र पॉकेट स्नुकर अॅकॅडमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईच्या अनुज अगरवाल याने क्यु कल्चरच्या मोहीत चंडेला याचा ५०-१२, ४६-०९, ७०-३० असा सरळ फ्रेममध्ये पराभव केला. दुसरा मुंबईचा खेळाडू अन्वर गाझी याने स्नुकर क्लबच्या वेदांत जोशी याचा प्रतिकार ४५-३८, २१-४३, ५३-३५, ५८-३२ असा मोडून काढला. स्नुकर क्लबच्या मनिष तलरेजा याने रोड हाऊस क्लबच्या अभिषेक लोखंडे याचा ४२-४९, ५८-३६, ५७-३०, ३३-५०, ५६-१० असा संघर्षपूर्ण पराभव केला.
स्नुकर क्लबच्या प्रसाद जुजगर याने कॉनर्र पॉकेट्सच्या चिंतामणी जाधव याचा ३६-३०, ४४-४७, २२-५८, ५२-०९, ६०-४८ असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. डेक्कन जिमखानाच्या गौरव देशमुख याने क्यु क्लबच्या मितेश श्रीगिरी याचा ५६-३२, ४८-२१, ४९-३४ असा सहज पराभव केला. रॉयल स्नुकर क्लबच्या अमिन उसगांवर याने कॉनर्र पॉकेट्सच्या जयराज सोनी याचा ३७-२५, ४०-०७, ५७-११ असा सहज पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः पहिली पात्रता फेरीः

मनिष तलरेजा (स्नुकर क्लब) वि.वि. अभिषेक लोखंडे (रोड हाऊस क्लब) ३-२ (४२-४९, ५८-३६, ५७-३०, ३३-५०, ५६-१०) प्रसाद जुजगर (स्नुकर क्लब) वि.वि. चिंतामणी जाधव (कॉनर्र पॉकेट्स) ३-२ (३६-३०, ४४-४७, २२-५८, ५२-०९, ६०-४८);

अनुज अगरवाल (मुंबई) वि.वि. मोहीत चंडेला (क्यु कल्चर) ३-० (५०-१२, ४६-०९, ७०-३०);
गौरव देशमुख (डेक्कन जिमखाना) वि.वि. मितेश श्रीगिरी (क्यु क्लब) ३-० (५६-३२, ४८-२१, ४९-३४);

अमिन उसगांवर (रॉयल स्नुकर क्लब) वि.वि. जयराज सोनी (कॉनर्र पॉकेट्स) ३-० (३७-२५, ४०-०७, ५७-११);
अन्वर गाझी (मुंबई) वि.वि. वेदांत जोशी (स्नुकर क्लब) ३-१ (४५-३८, २१-४३, ५३-३५, ५८-३२).