aappansare.in

Motivational

पहिली ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा !!

Share

ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !!

पुणे, १३ जुनः ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी अ संघाने पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ६४ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी अ संघाने ३५ षटकामध्ये ९ गडी गमावून १६९ धावांचे लक्ष्य उभे केले. संघाच्या डावाला आकार देताना सिद्धी शेलार (२५ धावा), विराट भिसे (२४ धावा), स्वरा गाडे (२४ धावा) आणि स्वराज मोरे (१९ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ३०.१ षटकामध्ये १०५ धावांवर आटोपला. अर्णव घाटे (१९ धावा) आणि प्रद्युम्न कानिटकर (१६ धावा) यांनी धावा करून प्रतिकार केला. पुणे अ‍ॅकॅडमीचा डाव मोडून काढताना शौर्य शेलार, स्वराज मोरे आणि स्टिफन शिरोडकर या तिघांनीही प्रत्येकी तीन गडी बाद करून संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचे संचालक नितीन सामल, इंडिफ्लायचे संचालक मेहेर करीम आणि कै. बापुसाहेब शेलार क्रीडानगरीचे समीर शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महेश कामठे, बिक्रम सेन, बालाजी चौधरी, सागर कांबळे आणि संजय मेहता आदि उपस्थित होते. विजेत्या ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी संघाला आणि उपविजेत्या पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.

अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी अः ३५ षटकात ९ गडी बाद १६९ धावा (सिद्धी शेलार २५, विराट भिसे २४, स्वरा गाडे २४, स्वराज मोरे १९, रितम सेन १४, अर्णव घाटे १-१०, साई जोंधळे १-२५) वि.वि. पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ३०.१ षटकात १० गडी बाद १०५ धावा (अर्णव घाटे १९, प्रद्युम्न कानिटकर १६, पार्थ ढोरे १३, स्वराज मोरे ३-१२, शौर्य शेलार ३-१४, स्टिफन शिरोडकर ३-१५); सामनावीरः शौर्य शेलार;

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः स्वराज मोरे (ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी, १७५ धावा आणि १४ विकेट);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः समर्थ घुले (घुले क्रिकेट अ‍ॅकॅडमी, २९५ धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः स्वराज मोरे (ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी, १४ विकेट);
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकः रितम सेन (ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः अर्णव घाटे (पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी

स्पर्धेत विजेतेपद मिळणारा ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमीचा संघ करंडकासह.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up