aappansare.in

Social

पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका; सोनाली मारणे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

Share

पुणे : कॉँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंग थांबायला तयार नसल्याचे दिसते.  सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविल्याचे समजते. मारणे या सध्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर कार्यरत होत्या.

हर्षवर्धन सपकाळ यांना लिहिलेल्या पत्रात सोनाली मारणे यांनी म्हंटले आहे की,  2011 पासून कॉंग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी काम करत आहे. ज्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून काम पक्षाने करायला हवा त्याप्रमाणे पक्ष काम करताना दिसत नाही याची खंत वाटते. जे काम करू शकतात त्यांना योग्य न्याय दिला जात नाही. तसेच निवडणूक आकडेवारी पेक्षा कार्यकर्त्यांच्या भावनांकडे लक्ष देण्यात पक्षाला अपयश आल्याचे नमूद  करत राष्ट्रीय कार्यकारणी कडून महाराष्ट्राला कायमच दुय्यम दर्जा दिला जात आहे, पक्षाकडे पुढील पंचवार्षिकसाठी कोणतीही योजना नाही असेही मारणे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up