aappansare.in

Social

रसिकाग्रणी गोविंदराव बेडेकर अमृतमहोत्सवानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन

Share

संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानच्या गुरुकुल दशकपूर्तीच्या सोहळ्या निमित्ताने गुरुकुलचे संस्थापक गोविंदराव बेडेकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता येत्या 27 ते 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या सांगितिक मैफिलीने होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंजुषा पाटील, समारंभ समितीचे मकरंद ब्रह्मे आणि गुरुकुलाचे सल्लागार, मार्गदर्शक ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
तिन दिवस चालणारा हा संगीत महोत्सव शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, एरंडवणे येथे होणार असून पहिल्या दिवशी दुपारी 4.30 वाजता पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया, पद्मभूषण स्वामी तेजोमयानंद आणि माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुध्दे यांच्या हस्ते गोविंदराव बेडेकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार केला जाणार आहे.
यावेळी बोलतांना श्री. सोलापूरकर म्हणाले की, शुक्रवारी (27 डिसेंबर) रोजी गोविंदराव बेडेकर यांची प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे तर पं. राकेश चौरसिया यांचे बासरीवादन व मंजुषा पाटील यांचे गायन होणार आहे. दुसऱ्या दिवशी (28 डिसेंबर) सकाळी 8.30 आणि दुपारी 4.30 अशा दोन सत्रात होणाऱ्या कार्यक्रमात पं. शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, पं. अजय पोहनकर अशा दिग्गज कलाकारांचे गायन होणार आहे. तिसऱ्या दिवशी (29 डिसेंबर) सकाळी 8.30 आणि दुपारी 4.30 अशा दोन सत्रात विदुषी आरती अंकलीकर, पद्मश्री पं. उल्हास कशाळकर अशा मान्यवर कलाकारांचे गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंजुषा पाटील म्हणाल्या की, गोविंदराव बेडेकरांनी 1989 मध्ये कोथरुडमध्ये गणपती मंदिर बांधले, ज्याला आज बेडेकर गणपती म्हटले जाते. आज हे पुण्यातील मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र झाले आहे. रामनवमी उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहा वर्षांपूर्वी त्यांनी पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानची आणि गुरुकुलाची स्थापना केली. सांगली आणि पुणे येथे गुरुकुल सुरू आहे. या गुरुकुलाचा दशकपूर्ती समारंभ देखील यानिमित्ताने साजरा केला जातो आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2023 पासून दर महिन्याला एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले गेले. ज्यात अनेकविध संगीताचे कार्यक्रम घेण्यात आले. आता या तिन दिवसांच्या संगीत महोत्सवाने अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता होत आहे, ज्याला अमृत-गोविंद असे नाव देण्यात आले होते. रसिकांनी या अमृतानुभवाचा आस्वाद घेण्यासाठी जरुर या संगीत महोत्सवाला यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने यावेळी करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up