स्वच्छ पुणे धनकवडी कार्यालयाने केराची टोपली
Share
हनुमान नगर आंबेगाव खुर्द या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे वारंवार दिसतंय धनकवडी क्षेत्रीय कार्यालयच्या अधिकरा खाली हा भाग येतो. सच्चाई माता परिसर अटल पाच ते अकरा या भागामध्ये ड्रेनेज लाईन अस्तित्वात नाही. त्याचा परिणाम हनुमान नगर रहिवाशी यांना पाण्याचा त्रास होतो. ड्रेनेच्या पाण्याबरोबर कचरा बाटल्या रसत्यावरती वाहून येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी डास बाटल्या फुटून काचा रस्त्यावरती पडलेले असतात. लहान मुले वृद्ध शालेय विद्यार्थी नागरिक सारखीच वर्दळ सुरू असते. क्षेत्रीय कार्यालय मार्फत या ठिकाणी साफसफाई करणे अत्यंत गरजेचे असून देखील पालिका कर्मचारी याकडे वारंवार दुर्लक्ष करताना दिसते. या ठिकाणी कुठलीही उपाययोजना न करता कर्मचारी मात्र काम चुकारपणा करताना आढळतात अनेक वर्षापासून या भागातील समस्या आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून मांडत असतात. या भागामध्ये अतिक्रमणचा विळखा मोठ्या प्रमाणात आढळतो महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था नाही. मुलांना खेळायला मैदान नाही. भाजी मंडई लाखो रुपये खर्च करून सुद्धा सुरू नाही. ट्राफिक ची समस्या खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आहे. अनेक नागरिक टँकर बोलून प्रायव्हेट पाणी माफिया अधिकारांच्या आशीर्वादाने डोकं वरती काढले आहे. पॉली कला या भागातून मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळतो पालिकेमध्ये 2017 मध्ये हा परिसर समाविष्ट होऊन सुद्धा पालिका मात्र नागरिकांच्या डोई जड होऊन कर्मचाऱ्यांना सातव वेतन चालू असून सुद्धा झाड लोट कचरा उचलणे कीटकनाशक फवारणी या भागामध्ये आत्तापर्यंत झालेली नाही. सरकारी कर्मचारी व ठेकेदार झोपेचं सोंग घेताना या भागामध्ये आढळतात. असा आरोप आप कडून करण्यात आला आहे.



