aappansare.in

Social

राजीव बर्वे, मधुमिता बर्वे यांनी दिलेल्या देणगीतून उभारलेल्यासाहित्य परिषदेतील प्रा. द. के. बर्वे स्वागतकक्षाचे बुधवारी उद्घाटन

Share

पुणे : उत्तम लेखक, मराठीचे व्यासंगी प्राध्यापक, दिलीपराज प्रकाशन या संस्थेचे संस्थापक प्रा. द. के. बर्वे यांच्या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषदेत उभारण्यात आलेल्या स्वागतकक्षाचा उद्घाटन समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे व मधुमिता बर्वे यांनी दिलेल्या देणगीतून स्वागतकक्ष उभारण्यात आला असून स्वागतकक्षाचे उद्घाटन बुधवार, दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम मसापाच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी असतील, अशी माहिती मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up