“माणसाचे हृदय बंद पडल्यानंतर सर्वसामान्य माणसाने त्यावेळी नेमकं काय करावे ? याची कार्यशाळा साई स्नेह हॉस्पिटलमध्ये संपन्न”
Share
गेल्या ४० वर्षापासून साई स्नेह हॉस्पिटल हे वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपून काम करत आहे.
कोविडच्या काळानंतर व सध्याच्या धावपळीच्या जीवनक्रमामुळे लोकांना ताणतणावाला सामोरे जाऊन व स्वतःसाठी शारीरिक व मानसिक व्यायामाच्या अभाव असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अनेक लोकांना हृदयविकार,डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक याला सामोरे जावे लागते व याचे प्रमाणही खूप प्रमाणात वाढलेले आहे.
साई स्नेह हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन महिन्यात हृदय बंद पडलेल्या पेशंटला कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन CPR करून व शॉक देऊन पेशंटचे हृदय परत चालू झाले हे सर्व पेशंटच्या बाबतीत होईलच असे नाही परंतु हृदय बंद पडल्याची घटना कुठेही होऊ शकते यासाठी CPR देणे म्हणजे काय? व तो कसा दिला पाहिजे हे दिल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो व त्याला नवीन जीवनदान मिळू शकते.म्हणून साई स्नेह हॉस्पिटल ने CPR प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेऊन सर्व सामान्य माणसांना CPR चे महत्व व ते कशा पद्धतीने दिले जाते याची प्रत्यक्ष कार्यशाळा गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. सर्व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने मा.वसंत मोरे शिवसेना पुणे शहर प्रमुख, विकासनाना फाटे सामाजिक कार्यकर्ते, सौ राणी भोसले मा. नगरसेविका, लायन्स क्लबचे अध्यक्ष भानुदास पायगुडे, व सेक्रेटरी ॲड भारती मॅडम , खजिनदार रवींद्र सादुल, मंगेश रासकर सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर नितीन शेलार सामाजिक कार्यकर्ते सचिन शेलार व सौ रुपाली शेलार हे सर्व उपस्थित होते व कात्रज धनकवडी परिसरातील सर्व पत्रकार बंधू भगिनी आवर्जून उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुनील जगताप यांनी CPR प्रशिक्षण चे महत्व CPR जीवन जगण्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगितले तसेच डॉ. सुमित जगताप यांनी नुकत्याच दोन पेशंटचे साई स्नेह हॉस्पिटलमध्ये CPR देऊन हृदय चालू केले त्या पेशंटबाबतचे काय काय उपचार केले त्याविषयी सविस्तर माहिती दिली पेशंटचे पती अभिजीत माळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी आवर्जून उल्लेख केला साई स्नेह हॉस्पिटलमध्ये डॉ. सुमित जगताप व सर्व त्यांच्या टीमने CPR देऊन जी काही ट्रीटमेंट केली त्यामुळेच आज माझी बायको ही परत मला व माझ्या परिवाराला मिळाली व CPR सर्वांनी शिकून घेतले पाहिजे असे त्यांनी आव्हान केले. तसेच दुसरे पेशंट अनिल दळवी यांच्या मुलाने डॉक्टर हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने देव ठरले असे म्हटले माझ्या वडिलांचे वय जास्त असूनही ते ह्या सगळ्या ट्रीटमेंट नंतर बाहेर पडले हे आमच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण आहे.साई स्नेह हॉस्पिटलच्या स्टाफने योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे असे म्हटले तसेच प्रमुख पाहुणे विकासनाना फाटे यांनी हा उपक्रम आम्ही गणपती उत्सव तसेच आमच्या सर्व मंडळाच्या वतीने जनजागृतीसाठी CPR देण्याचे ट्रेनिंगची कार्यशाळा आम्ही लवकरच वेगवेगळ्या ठिकाणी साई स्नेह हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करू असे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच वसंत तात्या मोरे यांनी ही कार्यशाळा समाज उपयोगी कशी आहे याविषयी भाष्य केले व समाजासाठी या कार्यशाळेचा उपयोग आम्ही चांगल्या पद्धतीने करू असे त्यांनी सांगितले
अशा कार्यशाळेची समाजाला गरज आहे . व ह्या कार्यशाळा वरचेवर घेऊन प्रशिक्षण दिल्यास अत्यावश्यक पेशंटला नक्कीच मदत होईल अशी भावना व्यक्त केली वरील दोन्ही पेशंटला हृदयबंद पडल्यानंतर डॉ. सुमित जगताप हृदयरोग तज्ञ व डॉक्टर पल्लवी जगताप आणि त्यांच्या सर्व टीमने घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करण्यात आले.
