मधुमाक्षिका पालन कृषि पूरक व्यवसाय नसून एक जबाबदारी : श्री.इंद्रजित बागल
Share

पुणे दि: : राष्ट्रीय मधुमक्षिका बोर्ड दिल्ली अणि राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था,मॅनेज हैद्राबाद प्रयोजित अणि सेंटर फॉर ऍग्रीकल्चर अँड रूरल एमपॉवर्मेंट,केअर फॉउंडेशन इंडिया आयोजित “7 दिवसीय वैज्ञानिक मधुमाक्षिका पालन” प्रशिक्षणाचा समारोप आकाशवाणी भवन पुणे येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.अवधूत कदम ( प्रमुख केअर फॉउंडेशन इंडिया यांनी केली
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्ह्णून श्री.इंद्रजित बागल ( प्रमुख दूरदर्शन व आकाशवाणी पुणे) हे उपस्थिती होते.
परागीभवन प्रक्रियेत मधमाश्यांचे महत्व असाधारण असून मधुमाक्षिका पालन हा फक्त कृषिपूरक व्यवसाय नसून एक जबादारी आहे असे प्रतिपादन श्री.इंद्रजित बागल यांनी केले. या प्रशिक्षण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 25 प्रशिक्षणार्थिनी सहभाग नोंदवाला होता. सर्वांना श्री.इंद्रजित बागल यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
मधु माक्षिका पालन तज्ञ श्री.हेमंतकुमार डुंबरे अणि श्री.संजय मारणे उपस्थित होते. श्री.ज्ञानेश्वर भोसले यांनी आभार मानले