aappansare.in

Social

पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त

Share

सुहास व्यास, शौनक अभिषेकी यांची गुरुवारी मैफल

पुणे : आकाशवाणी, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंडित व्यास यांच्या बंदिशींवर आधारित गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मैफल गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि शिष्य सुहास व्यास आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र आणि शिष्य प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशी सादर करणार आहेत. प्रमोद मराठे (संवादिनी) आणि सुभाष कामत (तबला) साथसंगत करणार आहेत. निवेदन मंगेश वाघमारे यांचे आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

OLYMPUS DIGITAL CAMERA

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up