aappansare.in

crime

दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, महिलेवर अत्याचार झाल्याची दिली खोटी माहिती, दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Share
Pune Crime News | Drunk man calls police control room, gives false information about woman being raped, case registered for giving misleading information

दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीविरोधात वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवास नारायण अकोले (वय-४२, रा- रामनगर, वारजे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल सूतकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागातील रामनगर परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची खोटी माहिती अकोले याने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला रविवारी (दि.९) दुपारी अडीचच्या सुमारास मिळाली. त्यानंतर वारजे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश बडाख, उपनिरीक्षक आर. आर. भरसट यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गस्त घालणाऱ्या पोलिसांचे पथक त्वरीत तेथे पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा रामनगर भागात महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली नसल्याचे उघडकीस आले. पोलीस नियंत्रण कक्षाला अकोले याने खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचे चैाकशीत उघडकीस आले. त्यानंतर दिशाभूल करणारी माहिती देणे, तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक आर. आर. भरसट अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up