डॉ.जयपाल पाटील यांची रस्ता सुरक्षा बाबत प्रात्यक्षिके
Share
जरा डोकं चालवा! आपली सुरक्षा आपली जबाबदारी .पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात डॉ.जयपाल पाटील यांची रस्ता सुरक्षा बाबत प्रात्यक्षिके
पेण:–रायगड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात डॉ. प्राध्यापक जयपाल पाटील यांची रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम निमित्ताने आपली सुरक्षा आपली जबाबदारी या अनुषंगाने स्वयंपाक घरात आग लागणे हार्ट ॅॲटक वाहन चालवताना कोणती खबरदारी घ्यावी या बाबत व्याख्यान आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन दाखवित डॉ.जयपाल पाटील आणि आपत्ती निवारण तज्ञ संदीप ढापरे यांनी आरटीओ अधिकारी वाहतूक पोलीस पळस्पे,दादर सागरी पोलीस पेण आणि जिते प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी वर्गाला संकटकाळात कसे काम करावे याचा प्रात्यक्षिक याव्दारे अनुभव करुन दिला .आरटीओ प्रशासन पेण अधिकारी महेश देवकाते याचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधिकारी माधव सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम वाहनचालक व आलेले नागरिकांना अनमोल मार्गदर्शन माहिती करुन देणारा ठरला..
अलिबाग येथील डॉ.जयपाल पाटील यांना राज्य व केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन तज्ञ मास्टर ट्रेनर म्हणून रायगड जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात ग्रामपंचायती, माध्यमिक शाळा कॉलेज यामधे यासाठी विशेष आमंत्रित करुन आपत्तीच्या संकट समयी आपली सुरक्षा आपल्या हाती या विषयाला अनुसरून पुरपरिस्थीती ,आग लागणे , आरोग्य समस्या, याबाबत कोणते महत्वाचे नंबर शासनाने आपत्ती काळात जाहीर केलेत त्या वेळी लागणारी मदत महिला सुरक्षा स्वयंपाक घरात सिलेंडर लिकेज होणे याबात कशा प्रकारे महिलांनी दक्षता घ्यावी याचे सुंदर विवेचन व प्रात्यक्षिके सादर करुन दाखवली.रस्ता महामार्गावरील वाहतूक सध्या गजबजलेली असते अशावेळी घरी आपली कोणीतरी वाट पहाते यासाठी डोकं ठिकाणावर ठेवून वाहतूक नियम पाळुन सुरक्षीत प्रवास हाच आपल्या आयुष्याला सुरक्षा प्रदान करणारा हेतू लक्षात कायम ठेवा असे सांगितले. सध्या हृदय विकाराचा झटका येणे ही मोठी समस्या आहे.यावेळी रुग्णाला काय करावे याचे प्रात्यक्षिक त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांवर केले एकंदर सुरेख मार्गदर्शन आणि त्याला जोड दिली ती फायर ब्रिगेड सेफ्टी तज्ञ संदीप ढापरे यांनी आग कशी विझवावी याबाबत महिला वर्गाला सोबत घेऊन प्रात्यक्षिके केली रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा कार्यक्रम जिते आरटीओ कार्यालयात आणि मैदानावर सुंदर सादर झाला.


या कार्यक्रमाप्रसंगी आरटीओ कार्यालयीन अधिकारी कर्मचारी, महामार्गावर अपघात झाल्याचे पळस्पे वाहतूक केंद्राचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीयुत वैभव रोंगे पाटील यांनी आपला संच वाहतूक पोलीस पळस्पे सहायक अधिकारी श्री. मनोज चौधरी पोलीस हवालदार श्री. सचिन शेरमकर,श्री. श्रीपाद ठाकूर, श्री. केसरीनाथ म्हात्रे श्री. संदेश म्हात्रे सुनील पाटील पाठविला. महिलांच्या सुरक्षेसाठी 112 क्रमांकाचा वापर कसा करावा याचे उपस्थितांना प्रात्यक्षिक देताना दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीयुत ब्राह्मणे अधिकारी यांनी आपला संच,श्रीमती अनुसया ढोणे, पीएसआय, पोलीस हवालदार श्री. अमोल सूर्यवंशी. श्री. मयूर पाटील श्रीमती स्वप्नाली पाटील यांना पाठविले. महिलांच्या बाळंतपणासाठी मोफत 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या जिते प्राथमिक आरोग्य केंद्रप्रमुख डॉक्टर संजय ठाकूर यांना संपर्क करतात. रुग्णवाहिका वाहन चालक श्री. किरण पाटील, आरोग्य सेविका श्रीमती दीपिका नाईक, उपस्थित झाले. या कार्यक्रमास कार्यालयातील कर्मचारी आणि कामानिमित्त 200 आलेले नागरिकांची मोठी उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्हा उप परिवहन अधिकारी श्री. माधव सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन दिग्विजय कोळी परिवहन अधिकारी यांनी केले आभार प्रदर्शन श्री. किरण पाटील परिवहन अधिकारी यांनी मानले.
