जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदना
Share
बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे २५ मार्च, २०२५ रोजी जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॅलिडोस्कोप हा सांस्कृतिक कार्यक्रम
पुणे : जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता करण्यात येणार आहे. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॅलिडोस्कोप या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना ॲड. आशिष शेलार मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून श्री विकास खारगे मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे.
या कार्यक्रमात ख्यातनाम कलावंत सहभाग घेणार आहेत.
निर्मिती : सुनील महाजन
संयोजन : निकिता मोघे
दृकश्राव्य सहभाग : रेखा इनामदार, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, विजया मेहता, विक्रम गोखले
नाटक : बॅरिस्टर, नातीगोती, सूर्यास्त सिनेमा चक्र, रावसाहेब, महानंदा, उत्तरायण आणि पुढचं पाऊल या कलाकृतींची झलक
अभिवाचन : अभिनेत्री स्वाती चिटणीस (नातीगोती), शैलेश दातार (स्वगत), राजेश दामले (मोहिनी दिवाकर) अभिनेते संजय मोने (ठणठणपाळ)
लेखन : सतीश जकातदार निवेदन राजेश दामले
विशेष सहभाग : गिरीश जयवंत दळवी या कलाकारांच्या कला सादरीकरणातून जयवंत दळवी यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येईल
रसिक प्रेक्षकांनी व नागरीकांनी या सांगितिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.