चिरीमिरी साठी विद्यार्थी वाहतुकीकडे दुर्लक्ष आप चा आरोप
Share

पुणे : विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे लक्ष बंधनकारक असताना अनेक सरकारी यंत्रणा त्यांचे काहीच देणे घेणे नसल्याचेही दिसून येत आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने बहुतांश नियम डावलून विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा वाहतूक शाखेकडून सुरुवातीला कारवाई झाली पण अद्य: स्थितीत ही कारवाईही थांबल्याने आंबेगाव खुर्द, आंबेगाव पठार,कात्रज, नरे आंबेगाव या भागामध्ये बहुतांश स्कूल बस नियमबाह्यतेच्या मार्गावर आले आहेत. नियमावलीनुसार प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीकडे लक्ष देणे बंधनकारक असताना अनेक स्कूल व्हॅन चालक प्रायव्हेट व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणे सोडवणे करताना आढळतात. अनेक पालकांची पिळवणूक करून आवाच्या सव्वा रुपये आकरताना आढळतात. दुसरीकडे स्कूल बस नियमावलीनुसारच धावते का हे शोधण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीही कामाची व ठोस उपाय योजना नाही. काही वेळेला लुटपटीची कारवाई होते व ती पुन्हा अनेक दिवसांसाठी थंडावते. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने स्कूल बस चालवण्याचे फावते आहे. स्कूल बसला पिवळा रंग व त्यावर ती संबंधी शाळेचे नाव, इतकाच नियम पाळून इतर सर्व नियमांना गुंडाळून ठेवत शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. प्रवासी वाहतुकीतून बाद झालेल्या गाड्यांना पिवळा कलर देऊन त्यांना स्कूल बस म्हणून रस्त्यावर आणायचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. मारुती व्हॅन सारख्या प्रामुख्याने समावेश आहे. वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून नेले जात असल्याचे चित्रही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. सकाळच्या वेळात या गाड्या तर एकदम सुसाट असतात. अनेक वेळा घातपात सुद्धा होतो. अनेक स्कूल बस मध्ये नियमानुसार महिला सहाय्यक नेमलेले नाहीत. असा आरोप आम आदमी पार्टी शहराध्यक्ष प्रशांत कांबळे सामाजिक न्याय विभाग यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक घटना घडून देखील चिरीमिरीसाठी जाणून बुजून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतात की काय मुजोर नियमबाह्य गाड्यांवर्ती कारवाई होणार का असा देखील प्रश्न उपस्थित होतो.