aappansare.in

Social

कोस्प्ले स्पर्धेत अपुर्वाने जिंकले ग्रॅन्ड प्राईज (एक लाख 25 हजार रूपयाचे पारितोषिक)

Share

 
तर सिंध्दात ने पटकवला पुणे कोस्प्ले स्पर्धेचा किताब (
50 हजाराचे पारितोषिक)

पुणे : क्रंची रोलच्या सौजन्याने आयोजित मारुती सुझुकी अरीना पुणे कॉमिक कॉन 2025 अंतर्गत कोस्प्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आयसीसी
क्वॉलिफायर 2025 च्या इंडियन कोस्प्ले चॅम्पशिप फायनलिस्ट मध्ये पुण्यातून अपुर्वाने लिओनाचा कोस्प्ले करित जाण्याचा मान मिळवत एक लाख 25 हजार रूपयाचे पारितोषिक मिळविले आहे. तसेच पुण्याचा कोस्प्ले चा किताब सिंध्दात ने द विच्च किंग चा कोस्प्ले करित पटकविला आहे. सिंध्दातला 50 हजाराचे पारितोषिक मिळाले आहे.
कोस्प्ले क्षेत्राला करियरच्या रुपात पाहावे या उद्देशाने कॉमिक कॉन तर्फे कोस्प्ले स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या स्पर्धेत 1500 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. या कॉमिक कॉनमध्ये चाहत्यांनी वेगवेगळ्या पात्रांचे वेष परिधान केले होते. डेडपूल, कॅप्टन अमेरिका, डेअरडेविल, ग्रीन गॉब्लिन तसेच विविध प्रकारच्या स्पायडर-मॅनसारख्या सुपरहिरोंपासून ते फ्लिटंस्टोन्स, टीम रॉकेट, जास्मिन, मोआना आणि माउई यांसारख्या लोकप्रिय पात्रांचे रंगतदार कोस्प्ले केले. तसेच चेनसॉ मॅन, अकाशुकी (नारुटो), रेंगोकू आणि तंजीरो (डेमोन स्लेयर) या अ‍ॅनिमे पात्रांचेही उत्साही आणि सर्जनशील कोस्प्ले पाहायला मिळाले.

पुणे कॉमिक कॉन मध्ये प्रसिद्ध कॉमिक बुक निर्माते ही सहभागी झाले होते. पुरस्कार विजेते ‘आर्ची कॉमिक्स’ लेखक डॅन पॅरेंट यांची उपस्थिती चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरली.त्यांच्यासोबत अभिजीत किणी स्टुडिओज, प्रसाद भट, बुल्सआय प्रेस, इंडसवर्स, बकरमॅक्स, गार्बेज बिन, आर्ट ऑफ सॅविओ, अक्षरा अशोक (हॅपीफ्लफ), सौमिन पटेल, लिलरोश, राजेश नागुलकोंडा, याली ड्रीम क्रिएशन्स, अर्बन टेल्स आणि भारतातील बरेच आघाडीचे कॉमिक बुक निर्माते मंचावर सहभागी झाले होते.

कॉमिक कॉन इंडिया संस्थापक जतिन वर्मा म्हणाले, पुणे कॉमिक कॉन पुणेकरांच्या कॉमिक्स, कोस्प्ले आणि पॉप कल्चरसाठी असलेल्या प्रेमामुळे हा अनुभव अद्वितीय ठरला. महाराष्ट्रभरातून कोस्प्लेअर्सचा सहभाग होता.
तसेच युनिव्हर्सल स्टुडिओजच्या ‘ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ’ आणि ‘हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन’ बूथने चाहत्यांना एका वेगळ्याच दुनियेत नेलं.नोडविन गेमिंग अरीना मध्ये प्ले स्टेशन, लेनोवो, इंटेल, एलिट हब्स, कॉर्सेअर, लॉजिटेक आणि क्लिप व्हीआर सारख्या ब्रँड्सचे थरारक गेमिंग अनुभव चाहत्यांना मिळाले. विशेषतः, इस्रोच्या चांद्रयान मिशनचा व्हीआर अनुभव घेण्याची संधी चाहत्यांना मिळाली, ज्याने त्यांना थेट अवकाश सफरीचा आनंद दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up