आषाढी एकादशी निमित्त श्री स्वामी बॅग्जच्या वतीने २५००० रोपांचे वाटप.
Share
पुणे (दि.४) आषाढी एकादशी निमित्त शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान व श्री स्वामी बॅग्ज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मोफत रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. स्थळ-श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान. गेल्या २४ वर्षांपासून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे मोफत तुळशी रोप तसेच औषधी व पर्यावरण पूरक रोपांचे वाटप करीत असतात. यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असतांना यावर्षी २५००० रोपांचे वाटप होणार आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांचे तसेच विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट विठ्ठलवाडी, पोलीस बंधू – भगिनी, पुणे महानगरपालिका, विजयश्री मित्र मंडळ विठ्ठलवाडी यांचे सहकार्य लाभते. तरी सर्व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी बॅग्जचे राहुल जगताप, शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे दीपक परदेशी, कु.वैभवी राहुल जगताप व कु.प्रणोती प्रफुल्ल जगताप यांनी पत्रकार संघ येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
