आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाची कार्यकारिणी जाहीर
Share
पुणे येथे आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा संघ, नवी दिल्ली, या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश तसेच, पुणे शहर कार्यकारणीच्या पदाधिकारी यांची निवड संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आली. तर नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुल उर्फ मनोज जगताप यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित सदस्यांना ओळखपत्र व निवडपत्र देण्यात आले. निवड झालेल्या नवनिर्वाचित सदस्य खालील प्रमाणे आहेत.

अध्यक्ष, पुणे शहर प्रसन्न हिंगणेकर, उपाध्यक्ष प्रशांत वेताळ, वरिष्ठ चीफ सेक्रेटरी राहुल साबळे, चिफ सेक्रेटरी संग्राम भोसले, सेक्रेटरी अमित दळवी, श्रीधर कामरे: सेक्रेटरी, जॉईन्ट सेक्रेटरी कैलास गुप्ता, अंबादास गंगेकर, डेप्टी सेक्रेटरी, शशांक रोहोकले, डेप्टी सेक्रेटरी, चंद्रशेखर पायगुडे, ऑफिस सेक्रेटरी सचिन पाटणकर, संघटक सचिव कुलदीप इनामळे, प्रेस मिडीया सेक्रेटरी, प्रेस मिडीया सेक्रेटरी कुमार बसवन, प्रेस मिडीया चिफ प्रदिप यादव हे आहेत.

मानवाच्या कल्याणासाठी आणि मानवाच्या न्याय हक्कासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ कार्यरत असून विद्येचे माहेरघर तसेच मेट्रो सिटी असलेल्या पुणे शहरात ही नवनिर्वाचित कार्यकारणी समाजहिताची कामे करेल. अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र कदम व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुल उर्फ मनोज जगताप यांनी पत्रकाद्वारे दिली.