अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व रत्नागिरी जेट्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द
Share
पुणे, १३ जून २०२५: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) 2025 स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स यांच्यातील लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने आतापर्यंत ५ सामन्यात २विजय, ३ पराभव व ४ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. तर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघ ४सामन्यात १विजय, २ पराभव, ३ गुणांसह पाचव्या स्थानी आहेत.
आज शनिवार, १४ जून २०२५ रोजी पीबीजी कोल्हापूर टस्कर्स समोर ४ एस पुणेरी बाप्पा संघाचे कडवे आव्हान असणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता गहुंजे येथील एमसीए क्रिकेट मैदानावर होणार आहे. याआधीची दोन्ही संघामधील लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आली होती व दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत आगेकूच करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.