aappansare.in

Social

राष्ट्रीयसमाजपक्ष पुणे शहराच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त ३,००० फोटो फ्रेम वाटपाचा उपक्रम सुरू

Share

पुणे, दि. ३१ मे – पुणे शहराच्या वतीने, राष्ट्रीय समाज पक्षाने महान समाजसुधारक आणि शासिका राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त एक विशेष सामाजिक उपक्रम राबविला आहे.

पुणे शहराध्यक्ष श्री बालाजी दादा पवार यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून पुणे शहरात ३,००० फोटो फ्रेम्सचे मोफत वाटप सुरू झाले असून, या उपक्रमाची सुरुवात प्रभाग क्रमांक ३९, धनकवडी – अंबेगाव पठार येथून झाली आहे.

हा उपक्रम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्राला आणि कार्याला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबविण्यात आला आहे. पुणे शहरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, पुढील काळात या वाटपाचा कार्यक्रम शहरातील विविध भागांमध्ये विस्तार केला जाणार आहे.

बालाजी दादा पवार यांनी सांगितले की, “राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा सामाजिक कार्य आणि नेतृत्व हे आदर्श आहे, आणि त्यांची प्रेरणा प्रत्येक घरात पोहोचविणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up