aappansare.in

Social

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फेप्रकाशकांसाठीचे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार जाहीर

Share

पुणे : अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे प्रकाशकांसाठी असलेल्या उत्कृष्ट ग्रंथनिमिर्ती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षी ९६ प्रकाशकांची ६३० पुस्तके प्रकाशक संघाला प्राप्त झाली होती. त्यातून पुरस्कारासाठी पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.
‘ग्रंथ तुमच्या दारी’ या भारतासहित विविध देशांत अतिशय यशस्वी ठरलेल्या उपक्रमाचे संस्थापक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिकचे विनायक रानडे, सुप्रसिद्ध चित्रकार वसुधा कुलकर्णी आणि नामवंत मुद्रक नंदप्रसाद बर्वे यांचा परिक्षकांमध्ये समावेश होता. पुरस्कारप्राप्त प्रकाशकांची नावे प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहेत.
पुरस्कारांची सविस्तर माहिती : विभाग, पुस्तकाचे नाव, प्रकाशनाचे नाव या क्रमाने :
ललित विभाग : प्रथम : उद्ध्वस्त वर्तमानाच्या दाहीदिशा – शब्दालय पब्लिकेशन हाऊस, श्रीरामपूर.
द्वितीय : अपराजिता – मिहाना पब्लिकेशन्स, पुणे.
उत्तेजनार्थ : सो कुल.. टेक २ – राजहंस प्रकाशन, पुणे.
ललितेतर विभाग : प्रथम : स्वरस्वामिनी आशा – डिंपल पब्लिकेशन, मुंबई.
द्वितीय : वसंत आबाजी डहाके (समग्र आकलन) – वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव.
उत्तेजनार्थ : १) : तडा – रोहन प्रकाशन, पुणे.
उत्तेजनार्थ : २) : इनुची गोष्ट – न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे.
संदर्भ ग्रंथ विभाग : प्रथम : वस्त्रगाथा – राजहंस प्रकाशन, पुणे.
द्वितीय : प्राचीन भारतीय खगोलविज्ञान – सकाळ मीडिया प्रा. लि. पुणे.
उत्तेजनार्थ : दापूर ते दिल्ली – जेके मीडिया, ठाणे.
उपयुक्त व छंदविषयक विभाग : प्रथम : फिल्मी कट्टा – सुरेश एजन्सी, पुणे.
द्वितीय : ब्रँडनामा २.० – दिलीपराज प्रकाशन, प्रा. लि. पुणे.
उत्तेजनार्थ : १ : वैदर्भीय खाद्यसंस्कृती – सकाळ मीडिया प्रा. लि. पुणे.
उत्तेजनार्थ : २ : महाभारत ते भारत @ २०२५ – हेड्विग मीडिया हाऊस, मुंबई
विज्ञानविषयक विभाग : प्रथम : इन्फोटेक – बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे.
उत्तेजनार्थ : कथा जैवविविधतेची – सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे.
शिशुसाहित्य विभाग : प्रथम : विठू विठू विठोबा – दिलीपराज प्रकाशन, प्रा. लि. पुणे.
उत्तेजनार्थ : फडताळातली खेळणी – संवेदना प्रकाशन, पुणे.
बालसाहित्य विभाग : प्रथम : छोट्यांसाठी गाणी आणि गोष्टी – गोबिझ मीडिया अँड मल्टीसर्विसेस.
उत्तेजनार्थ : तलजू व इतर बालनाट्ये – पंडित पब्लिकेशन्स, कणकवली.
कुमार साहित्य विभाग : प्रथम : अजब खजिना निसर्गाचा – रोहन प्रकाशन, पुणे.
उत्तेजनार्थ : छोट्यांच्या मोठ्या गोष्टी – मांजरा प्रकाशन, लातूर.
मुखपृष्ठ विभाग : (प्रौढ) : प्रथम : राक्षस आणि पोपटाची अ‍ॅडल्ट कथा – रोहन प्रकाशन, पुणे / चित्रकार : चंद्रमोहन कुलकर्णी.
द्वितीय : वर्जितमध्य : सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे / चित्रकार : अन्वर हुसेन.
उत्तेजनार्थ : भटकन – जेके मीडिया, ठाणे / चित्रकार : सरदार जाधव.
मुखपृष्ठ विभाग : (बाल) : प्रथम : अजब खजिना निसर्गाचा – रोहन प्रकाशन, पुणे / चित्रकार : अन्वर हुसेन.
प्रकाशक विभाग : लेखक (प्रौढ) प्रथम : आख्यान – सुरेश एजन्सी, पुणे.
प्रकाशक-लेखक विभाग : (प्रौढ) उत्तेजनार्थ : क्वेश्चन मार्क – सहित प्रकाशन, गोवा.
ग्रामीण व निमशहरी विभाग : प्रथम – गळ्यावरचा निळा डाग – वर्णमुद्रा पब्लिशर्स, शेगाव
द्वितीय : जमाखर्च आयुष्याचा – इसाप प्रकाशन, नांदेड.
उत्तेजनार्थ : वर्तुळ भाग – ३ – गुरुप्रज्ञा प्रकाशन, बदलापूर.
अनुवाद विभाग : (मराठीत) : प्रथम – जागतिक नोबेल कवी – मिहाना पब्लिकेशन्स, पुणे.
उत्तेजनार्थ : गंगालहरी – प्रसाद प्रकाशन, पुणे.
अनुवाद (इतर भाषांत) : प्रथम – Hambirrao Mohite –(हंबीरराव मोहिते) – वरदा प्रकाशन, प्रा. लि. पुणे.
अनुवाद (इतर भाषांत) उत्तेजनार्थ : Amazing America– (ॲमेझिंग अमेरिका) : ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती.
ई-बुक विभाग : (Ebook) प्रथम : टेरेस गार्डन – सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा.
उत्तेजनार्थ : स्वरभास्कर पं. भीमसेनजी जोशी – ई साहित्य प्रतिष्ठान.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up