aappansare.in

Social

स्वा. सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीरएस. पी. एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलने कोलूची ढाल पटकाविली

Share

पुणे : स्वा. सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून शालेय गटासाठी असलेली कोलूची ढाल एस. पी. एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविली.
स्वा. सावरकर वाङ्मय स्पर्धा आबासाहेब गरवारे महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे यंदाचे 39वे वर्ष आहे. पारितोषिक वितरण प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयीन व खुल्या गटात 11 तर शालेय स्पर्धेत 275 मुलांनी सहभाग घेतला होता.
खुल्या गटात प्रांजल अक्कलकोटकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर हेमांगिनी जवडेकर-पुराणिक यांना द्वितीय क्रमांक मिळाला. आंतर शालेय स्पर्धेत कनिष्ठ गटात प्रीती कुलकर्णी, आदिती गोसावी व तेजस मोघे यांना प्रथम क्रमांक मिळाला. तर वरिष्ठ गटात नक्षत्रा भंडारी व दिशा सपकाळ यांना प्रथम क्रमांक मिळाला. यंदा पालक आणि शिक्षकांच्या मागणीनुसार स्पर्धेत प्रायोगिक तत्त्वावर चौथीमधील काही मुले सहभागी करून घेण्यात आली होती. त्या गटात पलाश जहागिरदार याला प्रथम क्रमांक मिळाला.
स्पर्धेच्या आकर्षण असलेल्या तीन ढाली अनुक्रमे ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स व एस. पी. एम. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल यांना मिळाल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कौशल इनामदार म्हणाले, संस्कृती झिरपते, त्यावर समाज तयार होतो. आधी स्पर्धक होऊ नका, आधी चांगले श्रोते व्हा. येथे येऊन बोला, चुका, नवीन प्रयोग करा.
आनंद हर्डिकर, गणेश राऊत, शीतल गोडबोले, रानडे, वैशंपायन, मंगेशकर, भावे, मुळे, सावरीकर, स्नेहल लिमये, केंढे, अक्कलकोटकर यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धेचे आयोजन डॉ. आरती दातार, दिलीप पुरोहित, किशोर सरपोतदार, मिहिर मुळे, प्रिया कुलकर्णी, भूषण अशोक मराठे, श्रीहर्ष अरविंद मराठे यांनी केले.

स्वा. सावरकर वक्तृत्व स्पर्धेत विजयी स्पर्धकांसमवेत कौशल इनामदार आणि संयोजक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up