सुश्राव्य कविता, गझलांचा रविवारी ‘करम कोलाज’ कार्यक्रम
Share
पुणे : करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी करम प्रतिष्ठानच्या नामवंत कवयित्रींच्या सुश्राव्य कविता व गझलांच्या ‘करम कोलाज’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची संकल्पना करम प्रतिष्ठानेच अध्यक्ष भूषण कटककर यांची असून कार्यक्रम रविवार, दि. 16 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर येथे होणार आहे. प्राजक्ता पटवर्धन, निरुपमा महाजन, वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक, वैशाली माळी आणि चिन्मयी चिटणीस कविता-गझल सादर करणार आहेत, अशी माहिती भूषण कटककर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन, वासंती वैद्य, मुक्ता भुजबले कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.