राहुल घोरपडे यांना बुधवारी गीत सुमनांजलीअनन्वय आयोजित कार्यक्रमात प्रतिथयश गायकांचाही सहभाग
Share
पुणे : चतुरस्र संगीतकार राहुल घोरपडे यांना अनन्वयच्या वतीने बुधवारी गीत सुमनांजली वाहिली जाणार आहे. अनन्वयच्या गायक कलाकारांसह प्रसिद्ध गायक रवींद्र साठे, शौनक अभिषेकी, अनुराधा मराठे, रघुनंदन पणशीकर, मनिषा निश्चल यांचा सहभाग असणार आहे.
गीत सुमनांजली कार्यक्रम बुधवार, दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता द बॉक्स, नळस्टॉप मेट्रो स्टेशनजवळ येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अनन्वयच्या प्रमुख डॉ. माधवी वैद्य यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
अनन्वयच्या वाटचालीत मोलाचे योगदान असणाऱ्या राहुल घोरपडे यांचे 12 जानेवारीला निधन झाले. येत्या 12 तारखेला घोरपडे यांच्या जाण्याला एक महिना होत आहे. राहुल घोरपडे यांना सांगीतिक श्रद्धांजली वाहण्यासाठी अनन्वयचे गायक कलाकार घोरपडे यांनी संगीत दिलेली गीते सादर करणार आहेत. यात अनुराधा कुबेर, राजीव बर्वे, सौरभ दफ्तरदार, मनिषा पवार, अमृता कोलटकर, कुमार करंदीकर, मिनल पोंक्षे, राहुल धोंगडे यांचा सहभाग असणार आहे. तर विजय उपाध्ये, कुमार करंदीकर, केदार परांजपे, आदित्य आपटे, विनित तिकोनकर, निलेश श्रीखंडे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
:

राहुल घोरपडे