aappansare.in

Social

रविवार ८ डिसेंबर रोजी `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा साजरा होणार

Share

एकविरा देवी उत्सवाला सीकेपी बांधवांचा भरभरुन प्रतिसाद

पुणे : गेली काही वर्षे सीकेपी समाजात लोकप्रिय ठरलेला कार्ला एकविरा गडावरील `एक दिवस कायस्थांचा’ उत्सव रविवार दि. ८ डिसेंबर रोजी होणार आहे. या उत्सवासाठी राज्य व देशातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

गेली ८/९ वर्षे `एक दिवस कायस्थांचा’ एकविरा गडावर साजरा केला जातो. दरवर्षी उत्सवाची चढती कमान असते. यावर्षीही एक दिवस कायस्थांच्या सोहळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने एकविरा देवीचा होम करण्यात येणार असून या होमासाठी ज्ञातीतील जोडप्यांचा सहभाग असणार आहे. शिवाय महाआरती, पालखी, स्मरणिका प्रकाशन, भजन-किर्तन, भारुड इत्यांदी अनेक कार्यव्रâमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षी होणारा  कार्यक्रम  एकविरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वप्नपूर्ती बंगला परिसरात करण्यात येणार आहे. कार्ला येथील एकविरा देवी प्रामुख्याने सीकेपी, आगरी, कोळी व दैवज्ञ सोनार समाजाची म्हणून ओळखली जाते. नवसाला पावणारी देवी अशी श्रध्दा या समाजाची आहे. पूर्वी म्हणजे १८व्या शतकात एकविरा गडावर सीकेपी समाजाची धर्मशाळा होती. तसेच समाजातील मंडळींचा मोठा राबता होता. परंतु काळाच्या ओघात हे सर्व मागे पडले म्हणूनच सीकेपी संस्थेने `एक दिवस कायस्थांचा’ हा अभिनव कार्यव्रâम सुरु केला आणि देशभरातील सीकेपी बांधवांनी या कार्यक्रमाला  उत्स्फूर्त पाठींबा दिला.

यावर्षी म्हणजे ८ डिसेंबर रोजी होणाऱ्या  कार्यव्रâमास ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षीचा कार्यक्रम  सीकेपी समाजातील चार संस्था एकत्र येवून करीत आहेत. सीकेपी संस्था, कायस्थ प्रभू उत्कर्ष संस्था, पुणे सीकेपी फॅमेली ट्रस्ट, धर्मवीर आनंद दिघे विचार मंच इत्यांदीं संस्थांचा पुढाकार आहे. `एक दिवस कायस्थांच्या कार्यव्रâमाला कायमस्वरुपी भव्य स्वरुप यावे म्हणून देवीच्या नावाने विश्वस्त संस्था स्थापन करुन आगामी वर्षापासून उत्सव सोहळा होणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सीकेपी ज्ञातीतील विविध संस्थांतर्पेâ विकास देशमुख, स्वप्निल प्रधान, मिलिंद मथुरे, जयदिप कोरडे, निलेश गुप्ते, तुषार राजे इत्यांदींनी केले आहे.

1 Comment

  1. Gaurav December 7, 2024
    Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up