aappansare.in

Social

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे होणार गौरवस्नेहल दामले यांना उद्धव कानडे स्मृती पुरस्कार

Share


पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांचा गौरव केला जाणर आहे.

पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी कळविली आहे. सन्मानपत्र, शाळ, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, मृणालिनी कानिटकर-जोशी, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, स्वाती दाढे, डॉ. मिलिंद शेंडे, चंचल काळे, सचिन हनमघर, विनायक अनिखिंडी, केतकी देशपांडे, सुजाता पवार यांचा सहभाग असणार आहे.

स्नेहल दामले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up