aappansare.in

Social

माईक सिनेमातील भक्ती वेद प्रस्तुत “मन झाले विठ्ठल” गाणं रसिकांच्या भेटीला….

Share

पुणे (प्रतिनिधी): इंटरनॅशनल फालम फोक” या चित्रपटाच्या यशस्वी प्रस्तुतीनंतर विद्यानंद मंदाकिनी माणिकराव मानकर सर “माईक” हा चित्रपट घेवून येत आहेत. वैविद्या प्रॉडक्शन्स निर्मित सोहम वैशाली विद्यानंद मानकर दिग्दर्शित, “माईक” या चित्रपटाचे नुकतेच शूटिंग पूर्ण झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने “मन झाले विठ्ठल” हे गाणं प्रदर्शित करण्यात आले. अशी माहिती निर्माते विद्यानंद मानकर सर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
निर्माते श्री मानकर सर पुढे म्हणाले कि, भक्ती गीत गायनासाठी प्रसिद्ध असलेले श्री ज्ञानेश्वर मेश्राम यांनी हे गाणे गायले आहे. गीत लेखन तेजस वाल्हेकर यांनी तर सारंग गवळी, तेजस वाल्हेकर यांनी संगीतबद्ध केले. लेखन व संकलन विजय खुडे यांनी तर छायाचित्रण अन्सार खान यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा प्रथम पदार्पण पुरस्कार विजेता योगेश खिलारे माईक सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या अनुषंगाने वैविद्या प्रॉडक्शन्स तर्फे निर्मित “माईक” या मराठी चित्रपटासाठी आध्यात्मिक विषयास अनुसरून चित्रित झालेले भक्ती वेद प्रस्तुत आज रिलीज करण्यात आले.
दिग्दर्शक सोहम मानकर म्हणाले कि, दि. १९ जून २०२५ रोजी पासून सुरू होणाऱ्या आषाढीवारी पालखी सोहळा २०२५ च्या निमित्ताने “मन झाले विठ्ठल” हे गीत ‘भक्ती वेद यूट्यूब चॅनेल’ ‘www.youtube.com/@bhaktived’ तसेच, आय ट्यून्स, अँपल म्युझिक, गाणा, जीओ सावन, हंगामा, ऍमेझॉन म्युझिक, स्पॉ्टिफाय, वाय टी म्युझिक, रेशो, पेंडॉर & डिज़ोर – लाईव्ह प्लॅटफॉर्म ऑडिओ प्लॅटफॉर्म वर उपलब्ध झाले आहे.
“माईक” या मराठी चित्रपटासाठी “वैविद्या प्रॉडक्शन्स” नेहमीच दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी कथा, पटकथा, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, संगीत, छायांकन, संपादन आणि इतर तांत्रिक बाबी यांवर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करत असून, कलाकारांकडून योग्य अभिनय मिळवण्यासाठी उत्कृष्ट कलाकार आणि योग्य पात्र निवडण्यात, दिग्दर्शकाने कथेला योग्य रूप देण्याबाबत, योग्य ठिकाणी पार्श्वसंगीत आणि गाण्यांचा वापर करून घेतला आहे. तसेच, निर्मितीनंतर संपादन, ध्वनी मिश्रण, व्हिज्युअल इफेक्ट्स अशा बाबींचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटाची गुणवत्ता वाढवली आहे, याबरोबरच मराठी भाषा संवर्धन, समाज प्रबोधन व संस्कृती जपण्यासाठी “वैविद्या प्रॉडक्शन्स” नेहमीच कटिबद्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up