पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरवर दुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी
Share
३२ वर्षीय रुग्णाचे दृष्टीसुधार व सामान्य आयुष्य पुन्हा सुरू – मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथे यशस्वी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया
पुणे, ११ जून २०२५: बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन्सनी दुर्मिळ आजार असलेल्या पुण्यातील ३२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरवर मेंदूमधील वरील आर्टरीपासून मधल्या भागात असलेल्या आर्टरीपर्यंत बायपास (सामान्यतः ब्रेन बायपास सर्जरी म्हणून ओळखले जाते) यशस्वीरित्या पार पाडली. या स्थितीमध्ये रूग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत होता, ज्यामुळे त्याला वारंवार स्ट्रोक येत होते आणि स्ट्रोकनंतर एका डोळ्याची दृष्टी गेली होती. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून, त्याच्या डोळ्याची दृष्टी पुन्हा काही प्रमाणात परतली आहे – ही अपेक्षित नसलेली पण सकारात्मक बाब आहे. रुग्णाला होणारे वारंवार झटकेही थांबले आहेत.
सहा महिन्यांपर्यंत रुग्णाला कमी रक्तदाब किंवा डिहायड्रेशन यासह डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवत होता. त्याला हा त्रास काही मिनिटे जाणवायचा. उजव्या बाजूच्या मधल्या भागामधील सेरेब्रल आर्टरी (एमसीए) पूर्णपणे ब्लॉक झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे डॉक्टरांना त्याला मोया मोया आजार असल्याचा संशय आला, हा मेंदूमधील आर्टरींवर परिणाम करणारा आजार आहे, जो आशियाई व्यक्तींमध्ये अधिक आढळून येतो आणि तरुण व किशोरवयीन मुलांमध्ये अधिक आढळून येतो. मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्यासह ब्लॉक झालेली आर्टरी स्थिर नसल्यामुळे प्रचलित उपचाराऐवजी शस्त्रक्रिया करण्याचा विचार करण्यात आला.
या प्रकरणाबाबत सांगताना बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलमधील एचओडी व कन्सल्टण्ट -न्यूरोसर्जरी डॉ. अमित धाकोजी म्हणाले, “ ही केस खूपच गुंतागूंतीची होती, ज्यामुळेने आम्ही एसटीए-एमसीए बायपास करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मेंदूमधील वरील भागातील आर्टरी, तसेच मधल्या भागात असलेल्या आर्टरीमध्ये असलेल्या ब्लॉकेजला काढण्यात आले. यामुळे मेंदूमधील रक्तपुरवठा पूर्ववत झाला. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा झाला. वारंवार होणारे, अल्पकालीन इस्केमियाचे स्ट्रोक बंद झाले, तसेच शस्त्रक्रियेपूर्वी ज्या डोळ्याने दिसत नव्हते त्यामधून पुन्हा दिसू लागले होते, हे पाहून डॉक्टरांना आश्चर्य वाटले. ”
पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर संचालक श्री. आनंद मोटे म्हणाले , “मणिपाल हॉस्पिटल्समध्ये आम्ही असामान्य आणि गुंतागूंतीच्या परिस्थितीतही सतत अपवादात्मक वैद्यकीय उपचार देतो. या केसमधून वाखाणण्याजोगे टीमवर्क, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यापक क्लिनिकल ज्ञानाचे महत्त्व दिसून येते. आमच्या हॉस्पिटलमध्ये अचूकता आणि सहानुभूतीसह अत्याधुनिक न्यूरोसर्जिकल उपाय देऊ शकणारी सुविधा असल्याने आम्हाला अभिमान वाटतो. ”
डॉ. अमित धाकोजी, डॉ. श्रेय कुमार शाह आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
