aappansare.in

Social

पुणे जिल्हा, शहराची मानाची “पुणे श्री २०२५” शरीर सौष्ठव स्पर्धा रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ ला. अटीतटी च्या स्पर्धेत ठरणार “पुणे श्री २०२५” मानकरी.

Share

पुणे. ५ फेब्रुवारी २०२५.

द हिंदू फाऊंडेशन च्या वतीने आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्टव संघटनेच्या आणि फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स, पुणे. यांच्या सहकार्याने रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ मानाची पुणे श्री स्पर्धा रंगणार आहे.
सर्व युवकांना आकर्षित करणारा पुणे श्री २०२५ चा मानकरी हा या स्पर्धेत ठरणार आहे. पण याच बरोबर आणखी चार टायटल चे मानकरी या स्पर्धेत ठरणार आहेत.
अशी माहिती द हिंदू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी आज पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत दिली. रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०५. ०० वाजता पुणे जिल्ह्याची मानाची जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न आहे.
या स्पर्धेत “पुणे श्री २०२५” या मानाच्या टायटल बरोबर “ना. चंद्रकांतदादा पाटील द हिंदू श्री २०२५”
“ना. मुरलीधरआण्णा मोहोळ मेन्स फिजिक श्री. २०२५.”
“ना. माधुरीताई मिसाळ वुमेन्स फिजिक श्री २०२५”. “आमदार. मा. हेमंतभाऊ रासने श्री २०२५.” हे एकूण पाच टायटल विजेते शरीर सौष्ठव स्पर्धेच्या या विविध वजनी गटातून निवडून टायटल देउन सन्मानित केले जाणार आहेत.
देशात एकमेव या जिल्हास्तरीय स्पर्धेत असे पाच टायटल आणि पाच लाख रुपयांची रोख बक्षिसे दिली जातात. ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८० किलो वरील प्रत्येक वजनी गटातून अनुक्रमे १ ते १० विजेते होणार आहेत.
“मेन्स फिजिक श्री २०२५” या टायटल साठी १६५ सेंटीमीटर पर्यंत आणि १६५ सेंटीमीटर वरील या २ गटात स्पर्धा होईल. तसेच या दोन्ही ही गटात १ ते १० विजेते होतील. आणि यातून “मेन्स फिजिक श्री २०२५” टायटल विनर होईल.
स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रथमच वूमेन्स फिजिक महिला शरीर सौष्ठव पटू च्या एका गटातून “वूमेन्स फिजिक श्री २०२५” या टायटल साठीही स्पर्धा होणार आहे. आणि वूमेन्स फिजिक श्री २०२५” या गटातून निवडली जाणार आहे.
याच वूमेन्स फिजिक गटातून १ ते १० क्रमांक विजेत्या महिला विजेत्या ठरणार आहेत.
फक्त याच स्पर्धेत प्रत्येक वजनी गटात १ ते १० क्रमांक विजेते पारितोषिकां साठी निवडले जातात. इतर स्पर्धेत १ ते ५ विजेते निवडले जातात.
“पुणे श्री २०२५” या टायटल विजेत्यास रोख रक्कम २५५५५/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, प्रमाणपत्र,. “ना. चंद्रकांतदादा पाटील द हिंदू श्री २०२५” टायटल विजेत्यास रोख रक्कम १११११/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, प्रमाणपत्र. “ना. मुरलीधरआण्णा मोहोळ मेन्स फिजिक श्री. २०२५.” टायटल विजेत्यास रोख रक्कम १११११/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, प्रमाणपत्र. तसेच
“ना. माधुरीताई मिसाळ वुमेन्स फिजिक श्री २०२५”. टायटल विजेतीस रोख रक्कम १११११/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, प्रमाणपत्र *. *”आमदार. मा. हेमंतभाऊ रासने श्री २०२५.” *टायटल विजेत्यास रोख रक्कम १११११/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, मानाचा बेल्ट, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

            स्पर्धेत बेस्ट "बॉडी बिल्डर" आणि "मोस्ट इंप्रूव्हड" बॉडी बिल्डरला ला रोख रक्कम ५५५५/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र देउन गौरवण्यात येते. 

अनुक्रमे ७ वजनी गट. मेन्स फिजिक २ गट. वूमेन्स फिजिक १ गट. गटात १ ते १० क्रमांक विजेत्यांना खालील प्रमाणे पारितोषिके :-

१ ला क्रमांक विजेता रोख रक्कम ५५५५/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, अप्पर ट्रॅक, टी शर्ट, प्रमाणपत्र.
२ रा क्रमांक विजेता रोख रक्कम ४४४४/- रुपये. आकर्षक ट्रॉफी, अप्पर ट्रॅक, टी शर्ट, प्रमाणपत्र.
३ रा क्रमांक विजेता रोख रक्कम ३५५५/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, अप्पर ट्रॅक, टी शर्ट, प्रमाणपत्र.
४ था क्रमांक विजेता रोख रक्कम ३३३३/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, अप्पर ट्रॅक, टी शर्ट, प्रमाणपत्र.
५ वा क्रमांक विजेता रोख रक्कम २५५५/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, अप्पर ट्रॅक, टी शर्ट, प्रमाणपत्र.
६ वा क्रमांक विजेता रोख रक्कम २१११/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, अप्पर ट्रॅक, टी शर्ट, प्रमाणपत्र.
७ वा क्रमांक विजेता रोख रक्कम १७७७/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, अप्पर ट्रॅक, टी शर्ट, प्रमाणपत्र.
८ वा क्रमांक विजेता रोख रक्कम १६६६/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, अप्पर ट्रॅक, टी शर्ट, प्रमाणपत्र.
९ वा क्रमांक विजेता रोख रक्कम १५५५ /- रुपये, आकर्षक ट्रॉफी, अप्पर ट्रॅक, टी शर्ट, प्रमाणपत्र.
१० वा क्रमांक विजेता रोख रक्कम १३३३/- रुपये, आकर्षक ट्रॉफी, अप्पर टॉप, टी शर्ट, प्रमाणपत्र दिले जाईल.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक शरीरसौष्ठव पटूस टी- शर्ट आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या मानाच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त शरीरासौष्ठव पटू सहभाग घेतात.
अमृता देवेंद्र फडणवीस, गायिका, सामाजिक कार्यकर्त्या, ना. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार राज्यमंत्री,
ना. चंद्रकांतदादा पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य. ना. माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री. महाराष्ट्र शासन. आमदार हेमंत रासने, राजेश पांडे भाजपा प्रदेश सरचिटणीस. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार, मा. नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्तिथ राहणार आहेत.
लोकमान्य नगर जॉगिंग पार्क जवळ. लालबहादूर शास्त्री रोड. नवी पेठ, पुणे ३० येथे हि स्पर्धा संपन्न होणार आहे.

    या पत्रकार परिषदेस स्पर्धेचे संयोजक आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव. द हिंदू फाउंडेशन चे सचिव शिवाजी लोहकरे.    उपाध्यक्ष रवींद्र कांबळे. पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे सचिव मनीष पोकळे उपस्तिथ होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up