aappansare.in

Social

पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करा : संकर्षण कऱ्हाडे

Share

पुणे : स्पर्धेच्या युगात शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. शालेय शिक्षण घेत असताना पर्यावरण संवर्धनासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या 25व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत नाट्यनिर्माते सत्यजित धांडेकर यांच्यावतीने विविध शाळांमधील गरजू, होतकरू शालेय विद्यार्थ्यांना आज शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील व्हिआयपी कक्षात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संकर्षण कऱ्हाडे बोलत होते.
याप्रसंगी मनसे प्रदेश सरचिटणीस किशोर शिंदे, नाट्य परिषद कार्यकारणी सदस्य गिरीश महाजन, नाट्यनिर्माते सत्यजित धांडेकर, समीर हंपी उपस्थित होते.
प्रस्ताविकात सत्यजित धांडेकर यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागील कलाकार अक्षय जगताप, गणेश भोसले, केदार भालशंकर, बाळासाहेब धांडेकर, मदन गायधने यांनी मदत केली.


शालेय विद्यार्थ्यांसमवेत संकर्षण कऱ्हाडे, सत्यजित धांडेकर, समीर हंपी आदी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up