निवडणूकीत दिसणर DSK ठेवीदारांचा नाराजीचा सूरलोकशाहीने मतदानात दिलेला NOTA चा पर्याय वापरणार !!!
Share
२०१७ पासून डी एस कुलकर्णी यांच्या DSK Group कंपनीने ठेवीदारांची ठेव बरोबरच व्याजही देण्याची असमर्थतता दाखवल्यानंतर सुरू झालेला लढा आजही सुरूच आहे.DSK group मध्ये गुंतवणूक करणारे ३२ हजार ठेवीदार गुंतवणूक केलेल्या १२०० कोटीच्या परताव्याकरिता कायदेशीर लढाई लढत आहेत
DSK group विरूद्ध झालेल्या तक्रारी,नंतर दाखल झालेले गुन्हे ,सर्व संचालकांना अटक त्यानंतर न्यायालयाने १६ हजार कोटींची मालमत्ता फक्त ८२८ कोटींना ठराविक बांधकांम व्यवसायिकांना ७ वर्षाच्या मुदतीसह देण्याचा निर्णय घेताना कुठेही ठेवीदारांचा विचार न करणे थोडेसे संशयास्पद वाटते या प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा स्पर्श झाल्यासारखे दिसत आहे
सदर परिस्थिची चर्चा संपुर्ण राज्यात सुरू असताना
मागील ७ वर्षात कुठल्याही लोकप्रतिनिधी ,राजकीय नेते व सहकार महर्षींना आभाळ कोसळलेल्या ज्यांचे कष्टाची ठेव बुडतेय यांची दखल घेण्याची इच्छा झाली नाही सदर विषयाचे गांभीर्य कोणालाही नसून सातत्याने अनेक बँका अचानक बंद होणे सहकार माध्यमात ठेवीदारंची ठेव बुलड्यास विश्वासआर्हता संपुन सहकारी क्षेत्रात ठेवीदार गुंतवणूक करणे बंद होतील हे नक्की
मागील महिन्यात हिंदू महासंघ व ठेवीदार यांनी आयोजित मेळाव्यात आवाहन करूनही अगदी विधानसभेच्या निवडणूका असताना देखील ३२ हजार कुटुंब म्हजेच १.५० लाख जनतेच्या गंभीर विषयाकडे बघण्यास कुणालाही वेळ नाही हिंदू महासंघ मात्र ठेवीदारांसाठी सर्वच स्तरावर ठेवीदारांचा लढा पुढे नेण्याचे काम सातत्याने करीत आहे
नुकत्याच झालेल्या हिंदू महासंघ व ठेवीदारांच्या बैठकीत लोकशाही ने दिलेल्या हक्कातील मतदानात NOTA चा वापर करायचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार १.५० लाख लोक या निवडणूकीत गैर हजर राहतील किव्वा लोकशाहीनेच ने दिलेला NOTA वापण्याचे निश्चित झाले आहे

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे सहित मनोज तारे ,विवेक परदेशी,विद्या घटवाई,सुर्यकांत कुंभार,नितीन शुक्ल,आदिती जोशी
ठेवीदार संघटने कडून श्री दिपक फडणवीस ,शरद नातू ,सुधीर गोसावी ,नितीन मोरे यांनी उपस्थित राहून माहिती दिली