aappansare.in

Social

कविता, गझल, विडंबन काव्याची अनोखी मैफल रविवारी करम प्रतिष्ठानतर्फे ‌‘करम बहावा‌’ कार्यक्रमाचे आयोजन

Share

पुणे : कविता, गझल, विडंब, अभंग व अंतर्मुख करणाऱ्या काव्याची बरसात करणाऱ्या ‌‘करम बहावा‌’ या अनोख्या कार्यक्रमाचे करम प्रतिष्ठानतर्फे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम रविवार, दि. 8 जून रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रमात मिलिंद छत्रे, निरुपमा महाजन, डॉ. मंदार खरे, वैशाली माळी, भालचंद्र कुलकर्णी, शिवाजी सुतार, योगेश काळे, राहुल कुलकर्णी या करम प्रतिष्ठानच्या नामवंत कवी, कवयित्रींचा सहभाग असणार आहे. लेफ्टनंट कर्नल चारुदत्त रानडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कर्नल रानडे यांच्याकडून प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनुभव ऐकण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. प्राजक्ता वेदपाठक, मुक्ता भुजबले, वासंती वैद्य, वैजयंती आपटे कार्यक्रमाचे संयोजन करीत आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up