aappansare.in

Social

औरंगाबाद व अहमदनगरला त्यांच्या ऐतिहासिक ओळखीप्रमाणे स्थान देण्यात यावे – दया सिंह

Share

पुणे – नुकताच एका कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे जाण्यात आले आता औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर असे करण्यात आले आणि अहमदनगरचे अहिल्याबाई नगर असे करण्यात आले यावरून असे वाटते की सरकार मुघल इतिहास मिटवण्याचे दिशेने पुढे जात आहे मात्र हे करत असताना सरकारने हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे मुघल साम्राज्य मिटवत असताना कुठेतरी ते सिख धर्माला देखील मिटवण्याचा प्रयत्न होत आहे इतिहासात जेव्हा आपण या शहरांबद्दल बोलू तेव्हा सिख धर्माचा देखील उल्लेख महत्त्वाचा आहे आणि त्यावेळी घटना सांगताना या शहरांना औरंगाबाद आणि अहमदनगर असेच म्हटले जावे, अशी मागणी ऑल इंडिया पीस मिशन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दया सिंह यांनी पत्रकार परिषदेत केली.

“औरंगाबाद येथे गेले असता तेथील काही लोकांशी भेट झाली त्या ठिकाणी गुरुद्वार आहे जो भाई दया सिंग आणि धर्म सिंग यांच्याशी संबंधित आहे. हे दोघे तेच आहेत जे गुरु गोबिंद सिंग यांनी स्थापन केलेल्या ‘पंच प्यारे’ मध्ये होते. गुरु गोबिंद सिंग यांनी पंजाबमधील दीना कांगड येथून औरंगजेबाला ‘जफरनामा’ म्हणजेच ‘विजयपत्र’ पाठवले होते. त्या पत्रात त्यांना जे हाल सहन करावे लागले, त्याचा तपशील होता”.

त्यात सांगितलं होतं की, त्यांच्या दोन साहेबजाद्यांचा शहिद चमकौरच्या गढीमध्ये झाले आणि उर्वरित दोन लहान साहेबजादे आणि आई यांना सरहंदच्या सुबेदाराने शहीद केलं. हेच इस्लाम आहे का? असा मुद्दा पत्रात मांडला होता. हे पत्र ज्या वेळी औरंगजेबला देण्यात आले होते तेव्हा त्यावेळी औरंगजेब औरंगाबादमध्येच होता आणि त्याची फौज अहमदनगरमध्ये छावणी घालून होती. ‘जफरनामा’ औरंगाबादमध्ये येऊन भाई दया सिंग आणि धर्म सिंग यांनी औरंगजेबाला दिलं आणि ते वाचण्यात आलं. त्या पत्रातील वास्तवामुळे औरंगजेब स्वतः लाजिरवाणा झाला. ज्या गुरु तेग बहादुर यांनी उत्तर पूर्वेतील रियासतींशी भारतासाठी संधि केली होती, ज्या गुरु हरगोबिंदजींशी मुघल सल्तनतीचे चांगले संबंध होते, आणि ज्या अकबर बादशाहाने गुरूंना पंजाबमधील ८५ गावे दिली होती – त्याच परंपरेत औरंगजेबाने गुरु गोबिंद सिंग यांना दिल्लीला खास आमंत्रण दिले होते. दुर्दैवाने, त्या पत्रातील तथ्यांचा इतका प्रभाव झाला की औरंगजेबाची काही दिवसांतच मृत्यू झाला.

ही सर्व हकीकत जाणून घेतल्यानंतर मला धक्काच बसला. औरंगाबाद आणि अहमदनगर सिख धर्मासाठी इतक्या ऐतिहासिक महत्त्वाच्या जागा आहेत. तर मग ह्या इतिहासाला इतिहासाच्या पुस्तकातूनच का वगळलं जातंय?

मुघल काळ संपवण्याच्या नादात गुरू परंपराही विस्मरणात जाईल, अशी भीती आहे . हे खरोखरच चिंतेचं कारण आहे. खरंतर महाराष्ट्र सरकारने यासाठी एक विशेष विभाग स्थापन करायला हवा ज्यामध्ये जो ह्या ऐतिहासिक वारशांची नोंद, संशोधन आणि जतन करेल.

एकीकडे आदरणीय पंतप्रधान मोदीजी सिख समाजाबद्दल विशेष आपुलकी बाळगतात, तर दुसरीकडे त्यांना इतिहासातूनच वगळलं जातंय. माझी महाराष्ट्र सरकारकडे विनंती आहे की लवकरात लवकर काही ठोस पावलं उचलावीत आणि औरंगाबाद व अहमदनगरला त्यांच्या ऐतिहासिक ओळखीप्रमाणे स्थान दिलं जावं

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up