aappansare.in

Social

एबीसी प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा हंगाम

Share

एबीसी प्रो बास्केटबॉल लीगचा चौथा हंगाम नव्या संघांसह, सेलिब्रिटींनी भरलेल्या आणि युवक प्रतिभेने परिपूर्ण
● 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुला-मुलींसाठी एकूण 19 संघ सहभागी होणार
● सामने 4 जुलै ते 12 जुलै 2025 दरम्यान, राजाराम भिकु पठारे स्टेडियम, खराडी, पुणे येथे होणार आहे

एबीसी स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या वतीने आयोजित ही प्रीमिअर युथ बास्केटबॉल लीग नव्या जोमाने, नव्या फ्रँचायझींनी आणि विस्तारित स्वरूपासह परत येत आहे.
या सिझनची सुरुवात 4 जुलै 2025 रोजी राजाराम भिकु पठारे स्टेडियम, खराडी, पुणे येथे होणार असून अंतिम सामना 12 जुलै 2025 रोजी होईल. दररोज स्पर्धात्मक सामने होतील, ज्यामध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील उत्कृष्ट युवक खेळाडू आपली कौशल्ये दाखवतील. या लीगचा उद्देश म्हणजे तरुणांमध्ये बास्केटबॉलबद्दल अधिक आकर्षण निर्माण करणे आणि त्यांना एक व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे


या सिझनसाठी फ्रँचायझी मालकांमध्ये काही प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे – श्री. रोहित पवार (अहिल्यनगर फ्रँचायझी), सदानंद व विजय सुळे परिवार (मुंबई फ्रँचायझी), इंद्रनील चितळे (पुणे फ्रँचायझी), दीप्ती व मायरा शर्मा (नागपूर फ्रँचायझी), अमृता व हर्षल बिरारी (नाशिक फ्रँचायझी), स्मिता पाटील (नांदेड फ्रँचायझी), शशांक गोयंका (मुंबई उपनगर फ्रँचायझी), आणि सागर अग्रवाल, आकाश अग्रवाल आणि विशाल अग्रवाल, क्रिसाला डेव्हलपर्स (पिंपरी-चिंचवड फ्रँचायझी) – हे सर्व युवक क्रीडा आणि स्थानिक विकासासाठी उत्साही आहेत.
या वर्षीच्या लीगचे शीर्षक प्रायोजक आहेत क्रिसाला डेव्हलपर्स, तर अमनोरा पार्क टाउन कोर्ट स्पॉन्सर म्हणून सहभागी आहेत. तसेच, Hi5 युथ फाउंडेशन एनजीओ पार्टनर म्हणून जोडले गेले आहेत – या सर्वांचे योगदान लीगच्या यशात आणि पोहोचीत मोलाचे आहे.

एबीसी स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीचे संस्थापक श्री. अनिरुद्ध पोले यांनी लीगच्या दृष्टीकोनाबद्दल सांगताना म्हटले, “एबीसी प्रो बास्केटबॉल लीग ही युवक बास्केटबॉलसाठी एक सशक्त इकोसिस्टम उभारण्याच्या उद्देशाने डिझाइन करण्यात आली आहे. आमचे ध्येय म्हणजे शिस्त, स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा या मूल्यांचे बाळकडू युवकांना देणे आणि एक अशी प्रतिभावान खेळाडूंची फळी तयार करणे जी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकेल.”


या लीगला आणखी आकर्षक बनवण्यासाठी, बॉलिवूड अभिनेता श्री. सुनील शेट्टी यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे, जे युवा सहभाग आणि देशभरात या लीगची ओळख वाढवण्यास मदत करतील.
या सिझनमध्ये 14 वर्षांखालील मुलांचे 5 संघ, 14 वर्षांखालील मुलींचे 5 संघ, 17 वर्षांखालील मुलांचे 5 संघ आणि 17 वर्षांखालील मुलींचे 4 संघ सहभागी होणार आहेत. सर्व सामने राजाराम भिकु पथारे स्टेडियम येथे इनडोअर पद्धतीने होणार असून, उच्च दर्जाचे सामने आणि नियंत्रित वातावरण या स्पर्धेला अधिक व्यावसायिक बनवतील. सर्व सामन्यांना प्रवेश विनामूल्य आहे, आणि SportVot अ‍ॅपवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, ज्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना सामने पाहता येतील.



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up