आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडीच्या ‘गोष्टींची गोष्ट’ एकांकिकेस राजा नातू करंडक
Share
आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडीच्या ‘गोष्टींची गोष्ट’ एकांकिकेस राजा नातू करंडक
नाविन्यपूर्ण, कल्पक सादरीकरणासाठीचा मथुरामाई करंडक ‘गेम ओव्हर’ला
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडीने सादर केलेल्या ‘गोष्टींची गोष्ट’ या एकांकिकेने राजा नातू करंडक पटकाविला. नाविन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणासाठीचा मथुरामाई करंडक डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगरच्या ‘गेम ओव्हर’ या एकांकिकेस मिळाला.
भरत नाट्य मंदिर येथे दि. 15 ते दि. 21 जानेवारी 2025 या कालावधीत एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा निकाल आज (दि. 21) रात्री जाहीर करण्यात आला. स्पर्धेचे परिक्षण अरुण पटवर्धन, संगीता पुराणिक, देवेंद्र भिडे यांनी केले. स्पर्धेत 20 एकांकिकांचे सादरीकरण झाले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
सांघिक द्वितीय : शरद तळवलकर करंडक : माय सुपर हिरो (न्यू इंग्लिश स्कूल, रमणमाग)
सांघिक तृतीय : संजीवन करंडक : प्लॉन चीट (सेवासेदन इंग्लिश मिडियम स्कूल, एरंडवणे)
सर्वोत्तम दिग्दर्शक : मधू जोशी करंडक : संतोष माकुडे (गेम ओव्हर, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगर)
दिग्दर्शन उत्तेजनार्थ : मुग्धा वडके (गोष्टींची गोष्ट, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी)
सर्वोत्तम लेखन : वास्तूप्रसाद करंडक : संतोष माकुडे (गेम ओव्हर, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगर)
उत्तेजनार्थ लेखन : रवींद्र सातपुते (माय सुपर हिरो, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग)
अभिनय पुरस्कार : (पुरस्काराचे, विद्यार्थ्याचे नाव, भूमिका, एकांकिकेचे नाव, शाळा या क्रमाने)
स्पर्धेतील सर्वोत्त अभिनय : पु. ना. गाडगीळ करंडक : अस्मी गोगटे (परिकथा, आजी, गोष्टींची गोष्ट, आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी)
सर्वोकृष्ट अभिनय : मुलगा : प्रशांत सुभेदार करंडक : अमोघ कुलकर्णी (श्याम, माय सुपर हिरो, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग)
सर्वोकृष्ट अभिनय : मुलगी : रसिका जोशी करंडक : नाविन्या देशपांडे (ऋचा/गोदाक्का, प्लॉन चीट, सेवासदन इंग्लिश मिडियम स्कूल, एरंडवणे)
सर्वोकृष्ट वाचिक अभिनय : इंदिरा सदाशिव स्वराभिनय करंडक : प्रत्यूष महामुनी (बाबा/पेरुवाला, माय सुपर हिरो, न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग)
अभिनय उत्तेजनार्थ : (विद्यार्थ्याचे नाव, भूमिका, नाटकाचे नाव, शाळा या क्रमाने)
मन्वी लहुरीकर (झिलमिल, झिलमिल, एस. पी. एम. इंग्लिश स्कूल, पुणे)
शार्दुल अळवंडी (सनराज देशमुख, सुनियो, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे)
स्वानंदी सांगवीकर (प्रिया, केस स्टडी, व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल, नऱ्हे)
दुर्वा पाटील (खारुताई, राजकुमारी, गोष्टींची गोष्ट, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी)
मधुजा मिठभाकरे (पूर्वा, आदिम, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे)
तन्मय गुरव (रोहन, द लेसन, जी. के. गुरुकुल)
गौरव इनामके (अभिमन्यू, अखेर अभिमन्यूने चक्रव्यूह तोडलेच, श्री शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे)
अर्चिस थत्ते (आर्य, स्वयंपूर्ण, एम. ई. एस. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल, कोथरूड)
अवनी भट (मिनू, गेम ओव्हर, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगर)
ध्रुव ढासे (विनीत, ए फॉर…, भारतीय विद्या भवन सुलोचना नातू विद्या मंदिर, पुणे)