aappansare.in

Social

अक्षय परांजपेच्या संघर्षमय प्रवासाचा ‘अक्की’ मधून होणार उलगडा

Share

सचिन पिळगावकर यांच्या हस्ते 3 जून रोजी होणार प्रकाशन

पुणे : किशोर वयापर्यंत एकदम फिट असलेल्या मुलाला दहावीची परीक्षा तोंडावर असताना अचानक उद्भवलेल्या Wilson डिसीज मुळे दिव्यांग मुलांसारखे जगणे नशिबी आले, तरीही खचून न जाता अक्षय परांजपे या जिद्दी तरुणाने एक फोटोग्राफर म्हणून नावलौकिक मिळवला आहे. याच अक्षयच्या जीवनाची संघर्षगाथा, त्याचा प्रेरणादायी प्रवास ‘अक्की’ या पुस्तकामधून उलगडणार आहे. अशी माहिती अक्षयचे वडील संतोष परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अक्षय परांजपेच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘अक्की – एक अक्षय्य इच्छाशक्ती’ पुस्तकाचे प्रकाशन ३ जून रोजी बाल शिक्षण मंडळ च्या ओडिटोरियम मध्ये सायंकाळी 5 वाजता सचिन पिळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी मेधाताई कुलकर्णी(राज्यसभा खासदार),गीतकार वैभव जोशी,चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अजित गाडगीळ,अमोल रावतेकर,अमित फाळके,राजेश पांडे,सीमा देशमुख,श्रीरंग देशमुख तसेच कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, लेखक, कलाकार उपस्थित राहणार आहेत.

पुढे बोलताना परांजपे म्हणाले, अक्षय वयाच्या तीन वर्षांपर्यंत अगदी नॉर्मल होता, नंतर त्याला ताप आल्याने कानाच्या व्हेन्स वर परिणाम झाल्यामुळे त्याला ऐकायला कमी येऊ लागले तरीही तो बॅडमिंटन, सायकलिंग,बोलण अतिशय उत्तम होते NCC परेड घेणं इत्यादी मध्ये उत्तम कामगिरी करत असे. तो दहावीत असताना सहामाही परीक्षा झाल्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्य च Wilson या आजारामुळे बदलून गेले आम्हाला आणि रत्नागिरीच्या डॉक्टर्सना सुद्धा त्याचा नेमका उलगडा होऊ शकला नाही, त्याही परिस्थितीत त्याने दहावीला 66 टक्के गुण मिळवले. पुढे चार वर्षे तो अंथरूणात खिळून पडला होता तरीही अक्षयने जिद्दीने 12 वी ची परीक्षा दिली त्यात त्याने 88 टक्के गुण मिळविले होते. नंतर कॅमेऱ्याने त्याला आकर्षित केले आणि आज तो पुण्यात नावलौकिक मिळवत आहे. अक्षयचा हा संघर्षमय प्रवास या पुस्तकातून मांडण्यात आल्याचे परांजपे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Up